7 वर्षांच्या मुलीनं ऑनलाइन मागवलं जेवण, ऑर्डर देण्यासाठी आले 42 डिलिव्हरी बॉय

7 वर्षांच्या मुलीनं ऑनलाइन मागवलं जेवण, ऑर्डर देण्यासाठी आले 42 डिलिव्हरी बॉय

मुलीच्या घरी इंटरनेट स्लो होतं. त्यामुळे या अॅपमध्ये देखील माहिती भरताना गडबड झाली आणि तांत्रिक गडबडीमुळे अशा प्रकारची घटना घडली आहे.

  • Share this:

मनीला, 03 डिसेंबर : बऱ्याचवेळा ऑनलाइन ऑर्डर करताना ऑर्डरचे घोळ होतात किंवा चुकीची ऑर्डर येते किंवा मिसप्लेस होते. पण चक्क एका ऑर्डरसाठी चक्क 42 डिलिव्हरी बॉय आल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 वर्षांच्या मुलीने ऑनलाइन फूड ऑर्डर केलं होतं. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की मुलीनं चुकीची ऑर्डर केली पण असं नव्हतं झालं नेमका काय झाला होता गोंधळ जाणून घ्या.

नेमकं काय घडलं? 42 डिलिव्हरी बॉय कसे आले?

7 वर्षांच्या मुलीनं फूड पांडा या ऑनलाइन अॅपवरून खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते. ही ऑर्डर देण्यासाठी तब्बल एक दोन नाही तर 42 डिलिव्हरी बॉय घरी पोहोचले. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की मुलीकडून चुकून झालं असावं पण नंतर या प्रकरणाची चौकशी केल्यावर धक्काच बसला.

मोबाईल अॅपमध्ये झालेल्या गोंधळामुळे हा संपूर्ण प्रकार घडला होता. चिमुकलीनं ऑर्डर देखील योग्य केली होती. मात्र फूड पांडा ऑनलाइन अॅपमध्ये थोडी गडबड झाली आणि हा गोंधळ झाला. mashable दिलेल्या माहितीनुसार ही घटना फिलीपाइन्समध्ये सेबू या शहरात घडली आहे. 7 वर्षांच्या चिमुकलीनं फूड पांडा अॅपवरून चिकन कटलेट ऑर्डर केलं होतं. यावेळी चिमुकलीचे आई-वडील घरी नव्हते ती आजीकडे होती आणि ऑर्डर येण्याची वाट पाहात होती.

हे वाचा-LIC Policy: राहणार नाही मुलीच्या लग्नाचं टेन्शन! रोज करा 121 रुपयांची बचत, कन्यादानावेळी मिळवा 27 लाख

काही वेळात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन पोहोचला. त्यानंतर एक दोन नाही तर 42 डिलिव्हरी बॉय तीच ऑर्डर पुन्हा घेऊन येतात. हा सगळा प्रकार गोंधळात टाकणारा होता. डिलिव्हरी मुलांनादेखील हे प्रकरण काय आहे ते समजले नाही. मात्र, संपूर्ण घटना पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी जमली होती.

स्थानिकांनी हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फूड अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मुलीच्या घरी इंटरनेट स्लो होतं. त्यामुळे या अॅपमध्ये देखील माहिती भरताना गडबड झाली आणि तांत्रिक गडबडीमुळे अशा प्रकारची घटना घडली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 3, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या