मराठी बातम्या /बातम्या /Viral /रंगाचा बेरंग! नवरीला पाहण्याच्या कार्यक्रमात हाणामारी; महिलांनी एकमेकींना धू धू धुतलं

रंगाचा बेरंग! नवरीला पाहण्याच्या कार्यक्रमात हाणामारी; महिलांनी एकमेकींना धू धू धुतलं

नव्या नवरीचा (Bride) चेहरा दाखवण्याचा कार्यक्रम कुटुंबीयांना चांगलाच महागात पडला. या कार्यक्रमावरून पोलीस ठाण्यात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

नव्या नवरीचा (Bride) चेहरा दाखवण्याचा कार्यक्रम कुटुंबीयांना चांगलाच महागात पडला. या कार्यक्रमावरून पोलीस ठाण्यात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

नव्या नवरीचा (Bride) चेहरा दाखवण्याचा कार्यक्रम कुटुंबीयांना चांगलाच महागात पडला. या कार्यक्रमावरून पोलीस ठाण्यात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

भिंड, 04 जून : लग्नानंतर नवी नवरी दाखवण्याची अनेक ठिकाणी प्रथा असते. त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येतं. परिसरातील आजूबाजूच्या शेजारील महिलांना बोलावून हा कार्यक्रम केला जातो. मात्र, नवरीचा चेहरा दाखवण्याच्या कार्यक्रमात झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रम कुटुंबीयांना चांगलाच महागात पडला. या कार्यक्रमावरून पोलीस ठाण्यात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. नेमकं झालं असं की, नवरीचा चेहरा दाखवण्यासाठी शेजारील महिलांना बोलावण्यात आलं होतं. त्यातील एकीनं नवरी काळी असल्याचं म्हटलं. त्यावर दुसऱ्या एका महिलेनं चिडून गोऱ्या मुली तर पळून जातात, असे म्हटले. त्यामुळे तेथे जवळच उभी असलेली एक गोऱ्या रंगाची मुलगी चांगलीच संतापली आणि तिनं त्यावर आक्षेप घेतला. मग हा वाद चांगलाच पेटला.

या कार्यक्रमानंतर गोऱ्या मुली पळून जातात असे म्हटलेली महिला आणि मुलीच्या कुटुंबीयांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आणि त्याचे हाणामारीत रूपांतर झालं. संबंधित महिलेनं त्या मुलीच्या पोटावर चावा घेतला आणि तिचे केसही धरून ओढले. मारामारीच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. हा सर्व प्रकार मध्य प्रदेशमधील भिंडच्या कछपुरा गावातील आहे.

कछपुरा गावात नवरीचा चेहरा दाखवण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व काही ठीक सुरू होतं. नवरीला पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथे नाच-गाणी वगैरे करण्याचे काम सुरू झाले होते. त्या दरम्यान नेमकं एका महिलेने नवरीच्या रंगावरून कमेंट केली. त्यावर गावातील एका दुसऱ्या रेखा नावाच्या महिलेनं शेजारी उभा राहिलेल्या 17 वर्षीय किशोरी नावाच्या तरुणीकडं पाहत, गोऱ्या रंगाच्या मुली तर पळून जातात असे टोमणा देत म्हटले. गोऱ्या रंगाच्या मुलींचे अनेक मुलांसोबत चक्कर चालू असतात, त्या कधी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जातील याचा काही नेम नाही, असंही म्हटलं.

हे वाचा - VIDEO: मुंबईत देवदूतासारखे धावले GRP जवान; लोकलखाली येणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण

हा प्रकार ऐकून शेजारी उभी असलेली ती मुलगी चांगलीच संतापली. घडलेल्या प्रकारानंतर चिडून मुलगी तिच्या घरी निघून गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आईला आणि कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर आईच्या सांगण्यावरून किशोरी आपल्या बहिणीला घेऊन संबंधित महिलेच्या घरी गेली आणि तिच्या सासूकडे तिची तक्रार केली. या प्रकारावरून संतप्त झालेल्या रेखा नावाच्या त्या महिलेने किशोरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमध्ये महिलेने किशोरीच्या पोटाला चावा घेतला आणि त्यानंतर दोघी बहिणींनी मिळून त्याला महिलेलाही बेदम मारहाण केली.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh, Marriage