Home /News /viral /

Oh no! 60 मिनिटं 60 लोकांनी एकमेकांना तुडव तुडव तुडवलं, चक्क क्रुझमध्ये गावठी स्टाईल हाणामारी; Watch Video

Oh no! 60 मिनिटं 60 लोकांनी एकमेकांना तुडव तुडव तुडवलं, चक्क क्रुझमध्ये गावठी स्टाईल हाणामारी; Watch Video

    मुंबई, 02 जुलै : मुंबई लोकलमधील फायटिंगबाबत तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकलमधून नियमित प्रवास करणाऱ्यासाठी तर हे रोजचं आणि सामान्य झालं आहे. मुंबई लोकलमधील ही फायटिंग तुम्हीही प्रत्यक्षात पाहिली असेल किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहिली असेल. पण लोकलमध्ये होणाऱ्या फायटिंगपेक्षाही भारी अशा फायटिंगचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही फायटिंग रंगली ती क्रुझमध्ये (Cruise Fight Video). क्रुझमधील जबरदस्त फायटिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इथं प्रवाशांनी एकमेकांना लाथाबुक्क्या मारल्या आहेत. तब्बल 60 मिनिटं 60 लोकं एकमेकांना असेच तुडवत होते. मीडिया रिपोर्टनुसार कार्निव्हल क्रुझवर काही लोकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मारहाणीपर्यंत पोहोचला. हळूहळू या लढाईत जवळपास 60 लोकांनी उडी घेतली. लोक एकमेकांना मारू लागले. क्रुझवरील एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. नईम नावाच्या ट्विटर अकाऊंटवरही हा व्हिडीओ आहे. कार्निव्हल क्रुझवर काल माझी पार्टी, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हे लोक क्रुझवर पोहोचले कसे, त्यांना तिथं जाणं परवडलं कसं? असा सवाल एका युझरने विचारला आहे. तर काहींनी यांना क्रुझ, विमान किंवा ट्रेनमध्ये चढायला देऊ नये, या सर्वांना बॅन करावं, अशी मागणीही केली आहे. हे वाचा - बापरे! बुल्डोझरला लटकून गरागरा फिरताना फुटली कवटी, कॅमेऱ्यात कैद झाली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL याआधी एका विमानातील अशा फाइटचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. KLM (Klm फ्लाइट) च्या फ्लाइटमध्ये 6 प्रवाशांमध्ये भांडण झालं.  विमान मँचेस्टरहून अॅमस्टरडॅमला जात होतं. विमानाच्या मध्यभागी काही लोक एकमेकांना जोरजोरात बुक्यांनी मारहाण करत होते, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. विमानाच्या आतून घाबरलेल्या लोकांच्या ओरडण्याचा-किंचाळण्याचा आवाज येत आहेत. एक क्रू मेंबर भांडण सोडवण्यासाठी येतो, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तोही फार काही करू शकत नाही. या लोकांची गावठी स्टाईलने मारहाण सुरूच होती. हे वाचा - Shocking! कारमध्ये नको तो खेळ पडला भारी, झाला भयंकर स्फोट; अंगावर काटा आणणारा VIDEO हा वाद नेमका कशावरून सुरू झाला हे कळू शकले नाही. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या