Home /News /viral /

दोन वाघिणींमध्ये पाण्यात रंगला WWF चा थरार, पाहा लढाईचा दुर्मीळ VIDEO

दोन वाघिणींमध्ये पाण्यात रंगला WWF चा थरार, पाहा लढाईचा दुर्मीळ VIDEO

रिद्धी आणि सिद्धी असं या दोन वाघिणींचं नाव आहे. दोघी वाघिणी एकमेकांवर डरकाळी फोडून वचर्स्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

    माधोपुर, 26 नोव्हेंबर : वर्चस्व हा प्राण्यांमधला अगदी कळीचा मुद्दा असतो. आपल्या जागेवर कुणी दुसऱ्यानं हक्क सांगू नये यासाठी जीवाची बाजी लावली जाते. आतापर्यंत वाघांमधली जंगलात किंवा झाडा-झुडपातली किंवा वाघिणीसाठी केलेली लढाई पाहिली असेल पण चक्क पाण्यात WWF चा थरार रंगल्याचं पहिल्यांदाच आणि दुर्मीळ असा व्हिडीओ समोर आला आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या लढाईत वर्चस्व कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघांमध्ये आपला प्रदेश तयार करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सध्या त्याच परिसरातील झोन नंबर 4 मधला एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन वाघिणी तलावात एकमेकांमध्ये भिडल्या आहेत. त्यांच्या संघर्षातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-या गावात पाण्यालाच लागली आग, जळू लागलं नळाला येणारं पाणी; पाहा थरारक VIDEO मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ 25 नोव्हेंबरचा असल्याचं सांगितलं जात आहे. रिद्धी आणि सिद्धी असं या दोन वाघिणींचं नाव आहे. दोघी वाघिणी एकमेकांवर डरकाळी फोडून वचर्स्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही वाघिणींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. दोन्ही वाघांमधील परस्पर संघर्षाचा हा व्हिडीओ पार्कमध्ये आलेल्या पर्यटकांनी टिपली असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rajasthan, Video viral

    पुढील बातम्या