झेब्र्याची एक फाईट अन्...वाघाच्या जबड्यातून कशी केली सुटका, पाहा VIDEO

झेब्र्याची एक फाईट अन्...वाघाच्या जबड्यातून कशी केली सुटका, पाहा VIDEO

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : अनेकदा शिकारीचा थरार पाहायला मिळतो. कधी गायीनं आपल्या पिल्लासाठी तर कधी पक्ष्यानं आपल्या जोडीदारासाठी जीव पणाला लावून लढतो. साप असो किंवा सिंह किंवा वाघ त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि अनेक युझर्स हे पाहाणं पसंत देखील करत असतात.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की वाघानं आपलं सावज हेरून झेब्र्यावर हल्ला केला. त्याची मान पकडली आणि त्याला ओढत घेऊन जात असतानाच दुसरा मोठा झेब्रा आला. त्याने वाघाला पाहिलं आणि मोठ्या धाडसानं त्याच्या जबड्यावर लाथ मारून छोट्या झेब्र्याची सुटका केली. वाघाच्या तोंडातून शिकार सुटली आणि दोन्ही झेब्रे जीव मुठीत घेऊन पळत सुटले. शिकारीचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-हत्तीच्या पिल्लानं तरुणाला का मारली लाथ? पाहा मजेशीर VIDEO

16 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. याशिवाय काही युझर्सनी तर झेब्रा आणि त्याचं पिल्लू असल्याचाही अंदाज लावला आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. झेब्रा खूप धाडसी प्राणी असल्याचं मी म्हटलं होतं आणि त्याचं उदाहरण देखील पाहायला मिळालं असं सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 247 लोकांनी रिट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 29, 2020, 11:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या