मराठी बातम्या /बातम्या /Viral /PM मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली या मुलाची दखल, पराक्रमाने तुम्हालाही वाटेल आश्चर्य

PM मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली या मुलाची दखल, पराक्रमाने तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अडीच वर्षांपूर्वी धीरजने गंडक नदीपरिसरात मगरीच्या तोंडातून आपल्या 11 वर्षाच्या भावाला सुखरूप बाहेर काढले होते.

अडीच वर्षांपूर्वी धीरजने गंडक नदीपरिसरात मगरीच्या तोंडातून आपल्या 11 वर्षाच्या भावाला सुखरूप बाहेर काढले होते.

अडीच वर्षांपूर्वी धीरजने गंडक नदीपरिसरात मगरीच्या तोंडातून आपल्या 11 वर्षाच्या भावाला सुखरूप बाहेर काढले होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

आशीष कुमार (पश्चिम चंपारण), 26 मार्च : मागच्या चार दिवसांपूर्वी बिहार राज्य दिवस साजरा करण्यात आला. बिहार दिनानिमित्त, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथील गांधी मैदान येथे चौमुखा गावातील 16 वर्षीय धीरजला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. तसेच त्याच्या अभ्यासासाठी एक लॅपटॉप, एक अँड्रॉइड मोबाईल, बॅग आणि एक स्मार्ट घड्याळ दिले. पण, मुख्यमंत्र्यांनी धीरजला हा सन्मान का दिला, हे तुम्हाला माहीत आहे का?

अडीच वर्षांपूर्वी धीरजने गंडक नदीपरिसरात मगरीच्या तोंडातून आपल्या 11 वर्षाच्या भावाला सुखरूप बाहेर काढले होते. त्याच्या या शौर्याबद्दल, गेल्या वर्षी 24 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला पीएम राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले होते. दरम्यान याच्या शौर्याचा सन्मान म्हणून बिहार सरकारनेही त्याला पुरस्कार दिला आहे.

ISROने घडवला इतिहास, सर्वात मोठ्या रॉकेटमधून 36 उपग्रहांचे प्रक्षेपण; पाहा VIDEO

16 वर्षीय धीरजचे म्हणणे होते. ही घटना सप्टेंबर 2020 ची आहे. चौमुखा गावातील रहिवासी नीरज आणि त्याचा भाऊ धीरज हे आपल्या जनावरांना आंघोळीसाठी गंडक नदीवर गेले होते. काही अंतरावर दोघे वेगवेगळ्या म्हैशींना आंघोळ घालत होते. त्यावेळी 8 फूट लांबीची मगर पाण्यात डाव धरून बसली होती. याबाबत कोणालाही माहिती नव्हती.

अचानक जोराचा आवाज आल्यावर धिरजने मागे पाहिले तर त्याला भयानक दृश्य दिसले. पाण्यातून रौद्ररूप धारण करत मगरीने धिरजच्या भावावर मोठा हल्ला केला होता. धिरजचा भाऊ निरज याला मगर आत पाण्यात ओढून नेत असल्याचे दिसून येत होते. यावर धिरजने क्षणाचाही विलंब न करता भावाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्याला एका बाजूने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्या ठिकाणी बरेच लोक उपस्थित होते. परंतु कोणीही मदत केली नाही. कारण तो प्रसंग पाहून बरेचजण घाबरले होते.

मगर नीरजला मगर पाण्याखाली खूप वेगाने ओढत होती. पण धीरजने दुसऱ्या बाजून भावाला पकडून ठेवले होते, त्यामुळे तोही वेगाने पाण्यात बुडला जात होता. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून धीरजने पाण्यात पडलेल्या काठीने मगरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सततच्या हल्ल्यांच्या भीतीने मगरीने नीरजला सोडले. धीरजच्या म्हणण्यानुसार, पाण्यात फक्त रक्त दिसत होते. लहान भावासोबत तोही रक्ताने माखलेला होता.

नदीतून बाहेर आल्यावर नीरजची प्रकृती गंभीर दिसत होती. त्याच्या उजव्या पायाचे मांस लटकत होते. तो शुद्धीत असला तरी दोन्ही हातानी वर घेत धीरजने त्याला खांद्यावर उचलले घरी घेऊन गेला. तेथून दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

प्रवाशांकडून 1 कोटी वसूल करून महिलेनं बनवला रेकॉर्ड; रेल्वे तिकीट चेकरचं मंत्रालयानंही केलं कौतुक

यानंतर पुढचे दोन महिने नीरजवर उपचार करण्यात आले. नीरजच्या पायाला 350 टाके पडले, तर धीरजलाही 5 टाके पडले होते. पण धाडस करून निरजला वाचवलेल्या धिरजच्या शौर्याची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घेतली.

First published:
top videos

    Tags: Bihar, Local18