• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे बापरे! संसदेतच रंगला कुस्ती आखाडा, खासदारांच्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

अरे बापरे! संसदेतच रंगला कुस्ती आखाडा, खासदारांच्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

दोन्ही पक्षांच्या महिला खासदारांमध्ये जोरदार भांडणं (Fight in Parliament) झाले. महिलांनी एकमेकांचे केस खेचले आणि एकमेकांना ठोसे मारले.

 • Share this:
  नवी दिल्ली 11 जून: दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाच्या संसदेत तुफान हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. माजी राष्ट्रपतींच्या अटकेबाबत संसदेत चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते आपसात भिडले. पाहाता पाहाता संसदेचं कुस्तीच्या आखाड्यात रुपांतर झालं. दोन्ही पक्षांच्या महिला खासदारांमध्ये जोरदार भांडणं (Fight in Parliament) झाले. महिलांनी एकमेकांचे केस खेचले आणि एकमेकांना ठोसे मारले. माजी राष्ट्रपती जिनिन अनेझ यांना ताब्यात घेण्यावरून वाद सुरू असताना मंगळवारी संसदेत मारहाणीची ही घटना घडली. या दरम्यान, विरोधी पक्षनेते हेन्री माँटेरो आणि सत्ताधारी एमएएस पक्षाचे सदस्य अँटोनियो गॅब्रिएल कॉलके यांच्यात वादविवाद झाला. काही वेळातच वादविवाद इतका वाढला की दोन्ही नेते आपापल्या जागा सोडून संसदेच्या मध्यभागी आले आणि भांडणे सुरू झाली. Watch Video:सकाळी सकाळी पुण्यात कोणावर बरसले अजित पवार? दोन्ही नेत्यांची मारहाण पाहून इतर नेतेही याठिकाणी आले, पण त्यांची भांडणं सोडवण्याऐवजी तेदेखील याचाच एक भाग बनले. यात दोन महिला खासदाराही सहभागी झाल्या. व्हिडिओमध्ये दिसतं, की पुरुषांसह महिला खासदारही एकमेकांना मारहाण करीत आहेत. तातियाना अनेझ डे क्रिमोस आणि मारिया अलानोका अशी या महिला नेत्यांची नावे असल्याचं सांगितलं जात आहेत. हे प्रकरण शांत करण्यासाठी संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घरात घुसलेल्या तरुणाला 'दृश्यम' स्टाईलने संपवलं; असा गायब केला मृतदेह बोलिव्हियाचे माजी अंतरिम राष्ट्रपती जीनिन अनेज यांना मार्चमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. विरोधी पक्षांचा आरोप आहे, की सरकार जाणीवपूर्वक माजी राष्ट्रपतींना लक्ष्य करीत आहे. या विषयाबाबत संसदेत चर्चा सुरू होती. यावेळेस अशी चर्चा सुरू झाली, की जीनिन अनेज यांनी निवडणुकीत घोटाळा करत तात्पुरत्या सरकारचे नेतृत्व केले. हे ऐकून विरोधी पक्षाचे खासदार संतापले. इथूनच वादाला सुरुवात होऊन हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला.
  Published by:Kiran Pharate
  First published: