Home /News /viral /

दोन वाघांमध्ये तू-तू मैं-मै, एकमेकांना धरून लोळवलं, लढाईचा जबरदस्त VIDEO VIRAL

दोन वाघांमध्ये तू-तू मैं-मै, एकमेकांना धरून लोळवलं, लढाईचा जबरदस्त VIDEO VIRAL

दोन वाघांमध्ये झालेल्या जबरदस्त लढाईचा VIDEO VIRAL

    मुंबई, 06 डिसेंबर : वाघांचे शिकारीचे किंवा एकमेकांमधील लढाईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असतात. कधी वर्चस्वावरून तर कधी वाघिणीवरून दोन वाघांमध्ये झालेल्या लढाईचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले. आता सोशल मीडियावर दोन वाघांमधल्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सवाई माधोपूरच्या रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात दोन वाघांमधील लढाईचा एक थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन्ही वाघ खूप आक्रमक झाले आहेत. एकमेकांच्या तोंडावर पंजे मारून ही लढाई सुरू होते. दोघंही हार मानत नाहीत तर एकमेकांवर तुटून पडतात. 15 सेकंदाच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हे वाचा-Viral: अजगर, कोब्रासारख्या विषारी सापांचा सांभाळ करणारे भिक्कू या दोन वाघांमध्ये वर्चस्वावरून वाद झाला की आणखीन काही कारण होते याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र उपस्थित असलेल्या पर्यटकांनी हा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. सोशळ मीडियावर 5 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 500 हून अधिक लोकांनी रिट्वीट आणि कमेंट्स देखील केल्या आहेत. IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी देखील हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. तुम्ही खूप कमी उरले आहात त्यामुळे आपापसात लढू नका अशी कमेंट अनेक युझर्सनी केली आहे. झोन 3 मध्ये वाघीण आणि तिच्या पिल्लामध्ये कायम अशाप्रकारची लढाई होत असल्याचं एका युझरनं म्हटलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या