नवी दिल्ली 29 डिसेंबर : बस आणि ट्रेनमध्ये सीटवरून प्रवाशांमध्ये भांडणं झाल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र आता हा प्रकार जमिनीपासून हजारो मीटर उंचीवरही दिसू लागला आहे. होय, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बँकॉकहून येणाऱ्या फ्लाईटमध्ये भारतीय प्रवाशांनी फक्त भांडणच केलं नाही तर जोरदार मारामारीही केली. विमानातील कर्मचारी सतत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
व्हायरल होत असलेल्या या भांडणाच्या व्हिडिओमध्ये दोन पुरुष एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. तर विमानातील क्रू मेंबर्स परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हॉटेलमध्ये भीषण आग; लोकांनी पाचव्या मजल्यावरुन घेतल्या उड्या, 10 जणांचा मृत्यू, Shocking Video
या दोघांमधील एकजण दुसऱ्याला म्हणताना दिसतो, की "शांती से बैठ" (शांतपणे बस) तर दुसरा म्हणतो, "हाथ नीचे कर" (हात खाली कर). अवघ्या काही सेकंदात या भांडणाचं रुपांतर मारामारीत होतं आणि एक व्यक्ती दुसऱ्याला आपल्या साथीदारांसह मिळून मारायला सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती आपला चष्मा काढताना आणि मग दुसऱ्या व्यक्तीला मारताना दिसतो. तर तिथे असलेले इतर युवकही आपल्या मित्रासोबत मिळून या व्यक्तीला मारू लागतात. समोरचा व्यक्ती पलटवार करत नाही आणि तो फक्त आपला बचाव करताना दिसतो.
Not many smiles on this @ThaiSmileAirway flight at all ! On a serious note, an aircraft is possibly the worst place ever to get into an altercation with someone. Hope these nincompoops were arrested on arrival and dealt with by the authorities.#AvGeek pic.twitter.com/XCglmjtc9l
— VT-VLO (@Vinamralongani) December 28, 2022
व्हिडिओमध्ये सहप्रवासी आणि केबिन क्रू हे भांडण थांबवण्यास सांगत असल्याचं ऐकू येतं. बँकॉकहून कोलकात्याला येणाऱ्या विमानात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत थाई स्माईल एअरवेजकडून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी या तरुणावर काय कारवाई झाली याची माहिती मिळालेली नाही.
...अन् स्टेजवरच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव; तो क्षण कॅमेऱ्यात कैद, काय झालं पाहा..VIDEO
याआधी इंडिगोच्या एअर होस्टेसचा इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये प्रवाशासोबत जोरदार वाद झाल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. वादावादी झाली तेव्हा केबिन क्रूचा एक सदस्य प्रवाशांना जेवण देत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं, त्याचवेळी हा वाद झालेला. त्यानंतर एअर होस्टेसने प्रवाशाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला क्रूसोबत नम्रपणे बोलण्याची विनंती केली. मात्र एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात वाद सुरूच होता. जेव्हा हे प्रकरण वाढलं तेव्हा एअर होस्टेसने प्रवाशाला सांगितलं की तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. मी इथे एक कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.