• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video

हत्तींची तुंबळ हाणामारी, बघून तुम्हालाही घाम फुटेल, पाहा Viral Video

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे (Pets) कुत्री, मांजरींचे अनेक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. जंगलात राहणाऱ्या (Wild Animals and Birds)पक्ष्यांचे प्राण्यांचेही व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळतात. पण सर्वांत मोठा हत्ती या प्राण्याच्या युद्धाचा (elephant fight) व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल.

 • Share this:
  मुंबई, 20 एप्रिल: सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे (Pets) कुत्री, मांजरींचे अनेक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. जंगलात राहणाऱ्या (Wild Animals and Birds) पक्ष्यांचे प्राण्यांचेही व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळतात. पण सर्वांत मोठा हत्ती या प्राण्याच्या युद्धाचा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. टेकवेनी मीडिया (Tekweni Media) या युट्युब चॅनलने हत्तींच्या युद्धचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सर्कशीत किंवा महानगरपालिकेच्या बागेत पाळीव हत्ती माणसाच्या अंगावर पाणी उडवताताना किंवा सोंड वर करून नमस्कार करताना तुम्ही पाहिला असेल. पण या व्हिडिओतलं हत्तींचं रूप वेगळंच आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असं दिसतंय की कुठल्याशा जंगलातला (Jungal) एक निर्जन कच्चा रस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत. तिथं दोन हत्तींच्या मागच्या बाजूला आणखीही काही हत्ती उभे आहेत. पण पुढे दिसणारे हत्ती लढत आहेत. पहिला हत्ती आपल्या सोंडेनी दुसऱ्या हत्तीच्या मानेला वेढा घालण्याचा प्रयत्न करतो. दुसरा हत्ती तो वेढा सोडवून स्वत:ची सुटका करून घेतो. मग दुसरा हत्ती आपल्या सोंडेने जणू वारच करतोय असं वाटावा इतकं आक्रमक होतो आणि पहिल्या हत्तीला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो. पण पहिला हत्ती सावध असतो आपल्या सोंडेनेच दुसऱ्या हत्तीला रोखतो आणि पाय रोवून उभा राहतो. असे अनेक डाव हे हत्ती परस्परांवर टाकतात आणि उलथूनही लावतात. पण यात कुणीही जखमी होत नाही. त्यांचं हे युद्ध (Fighting Elephants) पाहताना भीतीही वाटू शकते. शेवटी मात्र दोघंही समजुतीनं घेतात आणि शेजारच्या झाडांची पानं खाऊ लागतात, असं या व्हिडिओत दिसत आहे. हत्ती म्हटलं की आपल्याला शांत प्राणी डोळ्यांसमोर येतो, पण जंगलांत कळपांमध्ये राहणारे हे हत्ती प्रसंगी रागावू शकतात आणि युद्धही करतात हे या व्हिडिओतून दिसून येतं. महाराष्ट्रात कर्नाटकला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात अनेकदा हत्तींचे कळप शेतात शिरून त्यांची नासधूस करतात. तेव्हा त्यांचं रौद्ररूप बघायला मिळतं. हत्ती या प्राण्याला रागवल्यावर त्यावर नियंत्रण करणं खूप अवघड असतं. पण तिथल्या शेतकऱ्यांना अंदाज असल्याने ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने विविध उपाय करून या हत्तींना पुन्हा जंगलात पिटाळून लावतात. पण या व्हिडिओसारखं हत्तींचं युद्ध हे क्वचितच बघायला मिळतं. या युट्युब चॅनलने (You tube Channel) ती संधी सर्वांना दिली आहे.
  First published: