Home /News /viral /

मुख्यध्यापकांच्या कॅबिनमध्ये राडा, प्राचार्य-प्रोफेसर एकमेकांना भिडले, सीसीटीव्हीत हाणामारीचा थरार

मुख्यध्यापकांच्या कॅबिनमध्ये राडा, प्राचार्य-प्रोफेसर एकमेकांना भिडले, सीसीटीव्हीत हाणामारीचा थरार

मध्यप्रदेशच्या कॉलेमध्ये एक प्राध्यापक आणि मुख्यध्यापक यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

    भोपाळ, 19 जानेवारी : मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील एका सरकारी महाविद्यालयातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत महाविद्यालयाचे एक सहाय्यक प्राध्यापक थेट मुख्यध्यापकांना मारहाण करताना दिसत आहे. खरंतर संबंधित व्हिडीओ हा महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांच्या कार्यालयातीलच आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुख्यध्यापक आणि संबंधित सहाय्यक प्राध्यापक यांच्यातील हाणामारी स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता येत आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मुख्यध्यापकामध्येच जर अशाप्रकारे हाणामारी होत असेल तर विद्यार्थ्यांना कशी शिस्त लागले? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित घटना ही उज्जैन जिल्ह्यातील घटिया तहसली कार्यालय हद्दीत असणाऱ्या स्वर्गीय नागुलाल मालवीय महाविद्यालयात घडली आहे. घटनेतील सहाय्यक प्राध्यापकाचं ब्रह्मदीप अलूने असं नाव आहे. तर मुख्यध्यापकांचं डॉक्टर शेखर मेदमवार असं नाव आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 15 जानेवारीला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. (अरे देवा! आता अज्ञात आजाराचं संकट; थेट मेंदूवरच हल्ला करत स्मरणशक्ती करतोय गायब) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत आधी प्राध्यापक आणि मुख्यध्यापक समोरासमोर खुर्चीवर चर्चा करत बसलेले असतात. यावेळी प्राध्यापक ताडकन उठतो आणि मुख्यध्यापकांच्या कानशिलात लगावतो. त्यानंतर तो टेबलवर जे सापडेल ते हातात धरतो आणि मुख्यध्यापकांच्या अंगावर मारुन फेकतो. तो एवढ्यावरच थांबत नाही तो मुख्यध्यापकांना पुन्हा मारहाण करण्यासाठी त्यांच्याजवळ जातो. यावेळी दोघांमध्ये हाणामारी होते. त्यांच्या या हाणामारीचा आवाज ऐकू आल्यानंतर काही विद्यार्थी आतमध्ये येतात. ते दोघांचं भांडण मिटविण्यासाठी परस्परांना लांब करतात. मुख्यध्यापकाची बाजू याप्रकरणी मुख्यध्यापक डॉक्टर शेखर मेदमवार यांनी आपली बाजू मांडली आहे. "आमच्याकडे आधीच कर्मचाऱ्यांची कमी आहे. 15 जानेवारीला कॉलेजमध्ये लसीकरण शिबिर राबवायचं होतं. मी त्यांना याचबाबत बातचित करण्यासाठी बोलावलं होतं. पण त्यांना राग आला. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली", अशी भूमिका मुख्यध्यापकांनी मांडली. प्राध्यापकाची प्रतिक्रिया दुसरीकडे प्राध्यापकांनी मुख्यध्यापकावर स्टाफसोबत गैरवर्तवणूक करण्याचा आरोप केला आहे. "मेदमवार यांच्या कार्यकाळात तीन जणांनी वेळेआधी सेवानिवृत्ती घेतली आहे. ते स्टाफसोबत अतिशय गैरवर्तवणूक करतात. त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावलं आणि अपशब्दांचा प्रयोग केला. त्यातूनच आमच्यात भांडण झालं", असं प्राध्यापकाने सांगितलं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या