माझ्या टॉमीला तू कुत्ता का म्हटलं? कुत्र्याच्या नावावरुन तुफान हाणामारी, CCTV मध्ये कैद झाली घटना
माझ्या टॉमीला तू कुत्ता का म्हटलं? कुत्र्याच्या नावावरुन तुफान हाणामारी, CCTV मध्ये कैद झाली घटना
कुत्र्याचं (Dog) नाव टॉमी असतानाही शेजाऱ्यानं त्याला कुत्रा म्हटल्यानं प्रकरण चांगलंच गंभीर झालं आहे. राग अनावर झाल्यानं कुत्र्याच्या मालकानं शेजाऱ्याला थेट मारहाणच (Man Beats Neighbours) केली आहे.
नवी दिल्ली 11 मे: मागील काही दिवसांपासून एक वाक्य तुमच्याही सतत कानावर पडत असेल. त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता? हे वाक्या तुम्हीही बऱ्याचदा ऐकलं असेल. मात्र आता याच वाक्याची अनुभूती देणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये कुत्र्याचं (Dog) नाव टॉमी असतानाही शेजाऱ्यानं त्याला कुत्रा म्हटल्यानं प्रकरण चांगलंच गंभीर झालं आहे. राग अनावर झाल्यानं कुत्र्याच्या मालकानं शेजाऱ्याला थेट मारहाणच (Man Beats Neighbor's) केली आहे. ही घटना आहे हरियाणातील गुरुग्राममधील.
गुरुग्रामच्या ज्योती पार्क येथील एका व्यक्तीनं एक कुत्रा पाळला आहे. प्रेमानं त्यानं या कुत्र्याचं नाव टॉमी असं ठेवलं आहे. मात्र, हा कुत्रा अत्यंत आक्रमक असल्यानं अनेकदा तो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना चावण्यासाठी धाव घेतो. यामुळे आसपासचे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच कारणामुळे या व्यक्तीच्या शेजारीच राहाणाऱ्या सुधीर यांनी कुत्र्याला साखळीनं बांधण्यास सांगितलं. कुत्र्याच्या मालकाला या गोष्टीचा राग आला नाही की त्याला साखळीनं बांधण्यास सांगितलं, तर या गोष्टीचा राग आला की त्याला कुत्रा का म्हटलं. मग काय, संतप्त झालेल्या मालकांनं सुधीर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की कुत्र्याच्या मालकानं सुधीर यांना थेट मारहाण करण्यासच सुरुवात केली.
ही मारहणा साधी नव्हती तर लाठ्या काठ्यांनी सुधीर यांच्यावर हल्ला करण्यात आला. कुत्र्याच्या मालकानं केवळ सुधीरवरच नाही तर त्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांवरही हल्ला केला. या घटनेत त्यांना दुखापतही झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुधीर यांनी याप्रकरणी गुरुग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.