मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉयफ्रेंडसाठी एकमेकींच्या झिंज्या उपटत तरुणींची तुफान हाणामारी, घटनेचा VIDEO

बॉयफ्रेंडसाठी एकमेकींच्या झिंज्या उपटत तरुणींची तुफान हाणामारी, घटनेचा VIDEO

तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आहे

तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आहे

तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

अमित राय, लखनऊ 04 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. जो अतिशय धक्कादायक आहे. यात एका मैदानावर भरपूर लोक जमा झालेले दिसत आहेत. इथे काहीतरी कार्यक्रम सुरू असून गाण्यांचाही आवाजही येत आहे. मात्र, या कार्यक्रमादरम्यान अचानक तरुणींच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Video : गरबा खेळताना तरुणीने ओलांडली मर्यादा; संतापजनक कृत्य कॅमेर्‍यात कैद

तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणींच्या या दोन गटांमध्ये बॉयफ्रेंडवरुन वाद झाला. याचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं आणि दोन्ही गटातील मुलींनी एकमेकींचे केस ओढून हाणामारी करण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

हे भांडण सुरू असताना आसपास उभा असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. लोक आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार शूट करत राहिले मात्र कोणीही त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी पुढे आलं नाही. व्हिडिओमध्ये दिसतं, की इथे भरपूर लोक जमलेले आहेत. सगळे अगदी आनंदात आहेत आणि याठिकाणी गाण्यांचा आवाजही येत आहे. मात्र, अचानक या तरुणींमध्ये हाणामारी सुरू होते. हा व्हिडिओ दहा ऑगस्टचा असल्याचं सांगितलं जात आहे

VIDEO - 40 सेकंदातच रोडरोमिओचा खेळ खल्लास; मुलीला छेडणाऱ्या तरुणाला आईनेच दिली अशी शिक्षा

या दोन तरुणींची मारहाण सुरू होताच कार्यक्रमात थोडा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतं. त्या दोघीही एकमेकांचे केस ओढून हाणामारी करताना दिसतात. त्यानंतर इतर तरुणी या दोघींकडे धाव घेतात आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. या दोघींना सोडवण्याच्या नादात इतर तरुणींमध्येही हाणामारी सुरू होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

First published:

Tags: Shocking video viral