मुंबई, 06 फेब्रुवारी : सोशल मीडियाचा समाज प्रबोधनासाठी व जनजागृतीसाठी वापर करण्यापेक्षा अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठी वापर केलेला आढळतो. भांडणं, वाद, मारामारी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृत्यं अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावरून व्हायरल होत असतात. अशा व्हायरल व्हिडिओजची खूप चर्चा होते; मात्र काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे गैरप्रकार समाजापुढे येऊन त्यावर कारवाई करता येते. बिहारमध्ये अशी एक घटना नुकतीच घडली. एका आरोग्य सेविकेनं डॉक्टरला चेहऱ्याचा मसाज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
बिहारमध्ये खगारिया इथे काम करणाऱ्या आरोग्य सेविकेच्या एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा होतेय. समाजहिताची जबाबदारी असलेल्या समाजातल्या काही घटकांकडून बेजबाबदार वर्तनाची अपेक्षा नसते; मात्र काही वेळेला वैयक्तिक गोष्टी समाजातल्या प्रतिमेला काळिमा फासतात.
हे ही पाहा : ग्वालियरमध्ये केजरीवाल विकतायत चाट? Video Viral होताच सर्वांना बसला धक्का
बिहारमधला एका डॉक्टर व आरोग्य सेविकेचा व्हायरल व्हिडिओ तशाच प्रकारचा आहे. त्यात आरोग्य सेविका त्या डॉक्टरच्या चेहऱ्याला मसाज करताना दिसतेय. दीपिका साहनी असं त्या आरोग्य सेविकेचं नाव आहे, तर डॉक्टरचं नाव कृष्णकुमार असं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातला वैद्यकिय अधिकारी गायब आहे. तो वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकेचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. फोटो व व्हिडिओ वेगवेगळ्या दिवशीचे आहेत अशी माहिती मिळाली आहे. व्हायरल झालेले फोटो 2 जानेवारी व 27 जानेवारीला एकाच कॅमेऱ्यातून काढलेले आहेत.
आरोग्य सेविका व डॉक्टर हे दोघं विवाहित असून, त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं जातंय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही त्यांच्यात खूप जवळीक असल्याचं दिसून येतंय. तसंच काही फोटोजमध्येही ते स्पष्ट दिसतंय.
मसाज करतानाच्या व्हिडिओमध्ये आरोग्य सेविका डॉक्टरला हा व्हिडिओ चित्रित करू नका असं सांगते आहे; मात्र तरीही डॉक्टरनं तो व्हिडिओ शूट केला आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राम नारायण चौधरी यांनी घेतली असून, दोघांकडूनही त्याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांचा हा प्रकार उघडकीस येऊन आता ही कारवाई करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral