मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - लेकाच्या दिशेने आला मृत्यू; सुपरहिरोसारखा अवघ्या एका सेकंदात बाबाने वाचवला जीव

VIDEO - लेकाच्या दिशेने आला मृत्यू; सुपरहिरोसारखा अवघ्या एका सेकंदात बाबाने वाचवला जीव

चिमुकला जवळपास मृत्यूच्या दारातच होता पण त्याच्या वडिलांनी मृत्यूला त्याला स्पर्शही करू दिला नाही.

चिमुकला जवळपास मृत्यूच्या दारातच होता पण त्याच्या वडिलांनी मृत्यूला त्याला स्पर्शही करू दिला नाही.

चिमुकला जवळपास मृत्यूच्या दारातच होता पण त्याच्या वडिलांनी मृत्यूला त्याला स्पर्शही करू दिला नाही.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 09 ऑगस्ट : कुणी संकटात अडकलं की अवघ्या काही सेकंदात जीव वाचवणारे सुपरहिरो तुम्हाला माहितीच आहे. रिअल लाइफमध्येही असाच सुपरहिरो बनला तो एक बाबा. आपल्या लेकाच्या दिशेने मृत्यू येताना दिसता एका सेकंदात त्याने त्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. पालकांसाठी त्यांची मुलंच सर्वकाही असतात. किंबहुना त्यांचा जीवच मुलांमध्ये अडकलेला असतो. त्यामुळे मुलांवर संकट आलं की ते आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. मुलांसमोर नेहमीच ढाल बनून उभे असतात. मुलांवर संकट येण्याआधीच ती परतवून लावतात. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एक चिमुकला जवळपास मृत्यूच्या दारातच होता पण त्याच्या वडिलांनी मृत्यूला त्याला स्पर्शही करू दिला नाही. हे वाचा - बापरे! श्वानाला वाचवण्यासाठी मुलांनी अजगराच्या विळख्यात टाकले आपले चिमुकले हात; काय झाला शेवट पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती रस्त्यावर उभी आहे. त्याच्यासमोर बाईक आहे आणि बाईकवर त्याने आपल्या चिमुकल्या लेकाला उभं केलं आहे. व्यक्ती तशी पाठमोरी उभी आहे. त्यामुळे मागे नेमकं काय आहे हे तसं त्याला दिसत नाही आहे. इतक्यात मागून एक भरधाव गाडी येते. त्याच क्षणी वडिलांना आपल्या लेकावर आलेल्या संकटाची जाणीव होते. जशी ती गाडी मुलाला उडवणार तशी ही व्यक्ती मुलाला उचलून लगेच बाजूला करते. गाडी भरधाव सुसाट पुढे निघून जाते.
View this post on Instagram

A post shared by TRT World (@trtworld)

यावेळी आपल्यालाही हृदयाची धडधड वाढते. त्यानंतर ही व्यक्ती तिथं असलेल्या महिलेजवळ या मुलाला देतो आणि गाडीचा पाठलाग करतो. पण तोपर्यंत गाडी खूप दूरवर गेलेली असते. हे वाचा - वडिलांनी खरेदी केलेली सेकंड हॅंड सायकल पाहून मुलाचा आनंद गगनात मावेना; व्हिडिओ व्हायरल @trtworld इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ. वडिलांनी ज्या पद्धतीने मुलाला वाचवलं त्यासाठी त्यांच्या सतर्कतेला आणि टाइमिंगला दाद दिली जाते आहे.
First published:

Tags: Accident, Viral, Viral videos

पुढील बातम्या