नवी दिल्ली 21 जानेवारी : प्रत्येक मुलासाठी आपले वडील एखाद्या सुपरहिरोपेक्षा कमी नसतात. वडील मुलांना केवळ प्रेरणा देत नाहीत तर त्यांच्याकडून चुका झाल्यावर त्यांना पाठिंबाही देतात आणि त्या चुका सुधरवण्याचा स्वतः प्रयत्नही करतात. अशाच एका वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं, की मुलीने घराच्या भिंतीवर चित्र काढून भिंत घाण केली, मात्र वडील तिच्यावर रागवत नाहीत. तर तिने बनवलेल्या या चित्राला अधिक सुंदर बनवतात आणि एक चांगला धडा देखील शिकवतात.
ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या नवरीबाईने मंडपात पोहोचण्यासाठी शोधला अनोखा जुगाड; काय केलं पाहा...VIDEO
@TheFigen_ या ट्विटर अकाउंटवर अनेकदा अजब व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक वडील भिंतीवर अतिशय सुंदर चित्र काढताना दिसत आहेत. अनेकदा पालक आपल्या मुलांच्या वागण्याने इतके अस्वस्थ होतात की त्यांना सुधारण्याऐवजी ते त्यांना मारहाण करू लागतात. पण ही सर्वात चुकीची कृती आहे, कारण जर मुलं काहीतरी क्रिएटिव्ह करत असतील तर त्यात त्यांच्याकडून चुकही होऊच शकते. अशा वेळी त्यांना खडसावलं तर त्यांचं मनोधैर्य खचतं.
Dad supports his daughter... and great art. pic.twitter.com/d3F6AXdlxB
— Figen (@TheFigen_) January 18, 2023
या व्हिडिओमध्ये वडिलांनी पालकत्वाचं उत्तम उदाहरण मांडलं आणि सर्जनशीलता दाखवण्यासोबतच मुलीचं मनोबल वाढवलं. मुलीने तिच्या घराच्या भिंतीवर मिकी माऊसचं कार्टून काढलं. आता लहान मुलांनी काढलेलं चित्र कसं असू शकतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता, त्यामुळे या पेंटिंगमुळे भिंत सुंदर दिसण्याऐवजी जास्त खराब दिसू लागली. मात्र वडिलांनी हे चित्र पुसलं नाही किंवा तिला ओरडलेही नाहीत. वडिलांनी डोकं चालवलं आणि मिकी माउसचं कटआउट भिंतीवर लावून पेंट केलं. यानंतर हे चित्र अतिशय सुंदर दिसू लागलं.
स्मार्टफोन घेऊन माकडांनी केलं असं काही की केंद्रीय मंत्रीही झाले चकित, शेअर केला VIDEO
या व्हिडिओला 8.3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 89 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत म्हटलं, की मुलीला सपोर्ट करण्याऐवजी पित्याने आपलंच स्कील प्रमोट केलं. दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की माझ्या घरीही मुलं असंच करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.