मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वडिलांनी खरेदी केलेली सेकंड हॅंड सायकल पाहून मुलाचा आनंद गगनात मावेना; व्हिडिओ व्हायरल

वडिलांनी खरेदी केलेली सेकंड हॅंड सायकल पाहून मुलाचा आनंद गगनात मावेना; व्हिडिओ व्हायरल

लहान मुलं त्यांचा आनंद कशात शोधतील हे सांगणं केवळ कठीण आहे. अशाच छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणाऱ्या एका बाप लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लहान मुलं त्यांचा आनंद कशात शोधतील हे सांगणं केवळ कठीण आहे. अशाच छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणाऱ्या एका बाप लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लहान मुलं त्यांचा आनंद कशात शोधतील हे सांगणं केवळ कठीण आहे. अशाच छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणाऱ्या एका बाप लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबई, 08 ऑगस्ट: जीवनात एखादी लहानशी गोष्टही मोठा आनंद  देऊन जाते. लहान मुलं त्यांचा आनंद कशात शोधतील हे सांगणं केवळ कठीण आहे. घरात एखादी नवी वस्तू आली की लहान मुलांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. नव्या गोष्टीविषयी त्यांच्या मनात एक प्रकारचं आकर्षण असतं. घरी आणलेली वस्तू नवी आहे की सेकंड हॅंड हे त्यांच्यासाठी फारसं महत्त्वाचं नसतं. ते केवळ आनंद शोधतात. सध्या इंटरनेटवर एक खास व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. वडिलांनी सेकंड हॅंड सायकल खरेदी केली. ही सायकल पाहून मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं या व्हिडिओत दिसतं. या व्हिडिओने नेटिझन्सचं मन जिंकलं असून, हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी बघितला आहे. झी न्यूज हिंदीने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सेकंड हॅंड कार खरेदी करणं, ही काही जणांसाठी छोटी, तर काही जणांसाठी मोठी गोष्ट असते. घरात कोणतीही नवी वस्तू आली की त्यामुळे कुटुंबातलं वातावरण आनंदी होतं; पण जुनी वस्तू खरेदी केल्यानंतर एखाद्याला खूपच मोठा आनंद मिळाल्याचं क्वचितच पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वडिलांनी सेकंड हॅंड सायकल खरेदी केली असून, ही सायकल पाहून त्यांच्या मुलाच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचं या व्हिडिओत दिसतं. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केला आहे. हेही वाचा - कपड्यांमुळे झालं महिलेच्या भयंकर आजाराचं निदान; ज्याला समजत होती शरीराचं फॅट तो खरंतर... हा व्हिडिओ ट्विट करताना ते कॅप्शनमध्ये लिहितात, `ही एक सेकंड हॅंड सायकल आहे; मात्र या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. नवीन मर्सिडिज बेंझ खरेदी केल्याचे भाव या दोघांच्या चेहऱ्यावर दिसतात.` या व्हिडिओनं नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील भावनिक व्हाल. या व्हिडिओत, वडिलांनी एक सेकंड हॅंड सायकल खरेदी करून ती घरी आणली आहे. ही सायकल पाहून त्यांच्या मुलाला खूप आनंद झाला आहे. हा मुलगा इतका खूश आहे, की त्याच्या वडिलांनी एखादी महागडी कार खरेदी केली आहे, असं त्याला वाटतंय. ती व्यक्ती सायकलला फुलांचा हार घालते आणि तिची पूजा करताना दिसते. त्या व्यक्तीसमोर त्यांचा मुलगा हात जोडून उभा आहे आणि खूप आनंदी दिसतोय. एकूण या बाप-लेकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर तुमचंही मन भरून येईल. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
First published:

Tags: Videos viral, Viral, Viral news

पुढील बातम्या