मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुलाच्या एका चुकीमुळे बाप झाला कोट्यवधी; कुटुंबाला बसला आश्चर्याचा धक्का!

मुलाच्या एका चुकीमुळे बाप झाला कोट्यवधी; कुटुंबाला बसला आश्चर्याचा धक्का!

कधी कधी मुलांची एक चूक तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

कधी कधी मुलांची एक चूक तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

कधी कधी मुलांची एक चूक तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : राजाचा रंक आणि फकीराचा श्रीमंत होण्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. म्हणजे एखाद्याचं नशीब कधी बदलेल काही सांगू शकत नाही. अशीच एक घटना अमेरिकेतील (US News) मेरीलँडमधून समोर आली आहे. येथील एका बापाला मुलाच्या एका छोटाशा चुकीमुळे कोट्यवधी केलं आहे. कसं बदललं नशीब? खरं तर या व्यक्तीला तब्बल 1 मिलियन डॉलरचा जॅकपॉट ($1 million Powerball jackpot) लागला. कसा झाला हा चमत्कार..जाणून घ्या..मेरिलँड (Maryland) निवासी 51 वर्षांच्या प्रिंस जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. गाडीत बसल्यानंतर त्यांना कळालं की, मुलाने कारच्या दरवाज्यात आपलं जॅकेट अडकवलं होतं. जे जमिनीवर लोळल्यामुळे मळलं आहे. त्यानंतर जॅकेट स्वच्छ करून घेण्यासाठी ते जवळील ड्राय क्लीनरच्या दुकानात पोहोचले. यूएस वेबसाइट upi.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, प्रिन्स जॉर्जने सांगितलं की, ही घटना गेल्या महिन्यातून असून ते त्या वेळी ड्रायक्लीनर्सकडे गेले होते. त्यावेळी 22 सप्टेंबरच्या ड्राइंगसाठी 2 डॉलरमध्ये एक लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. तब्बल एक आठवड्यापर्यंत ते तिकीट घरात पडून होतं. अचानक त्या दिवशी त्यांना तिकीटाची आठवण आली. त्यांनी फोनवर चेक केलं तर त्यांना एक मिलियन म्हणजे तब्बल 7 कोटींचा जॅकपॉट लागल्याचं वृत्त मिळालं. हे ऐकून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. हे ही वाचा-विचित्र कारणामुळे मॉडेलने 3 वर्षांपर्यंत केला नाही सेक्स; आता अशी झाली अवस्था भविष्याची प्लानिग.. लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मला एकदम झटका लागला आणि मी खालीच बसलो. त्या व्यक्तीने सांगितलं की, लॉटरीत मिळालेल्या पैशांमधून ते मुलांच्या कॉलेजची फी, बिल आणि कुटुंबातील सदस्यांची मदत करणार आहेत. याशिवाय चांगल्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठीदेखील पैसे खर्च करणार असल्याचं सांगितलं. त्या दिवशी मुलाने जॅकेट खराब केलं नसतं तर त्यांनी लॉटरीचं तिकीटही खरेदी केलं नसतं. मुलाची ती चूक कुटुंबासाठी फायदेशीर ठरली आहे.
First published:

Tags: Money, Viral

पुढील बातम्या