Home /News /viral /

शेरास सव्वाशेर! बाबांच्या मारावर चिमुकल्या लेकाचा 'डायलॉगवार'; VIDEO पाहून पोट धरून हसाल

शेरास सव्वाशेर! बाबांच्या मारावर चिमुकल्या लेकाचा 'डायलॉगवार'; VIDEO पाहून पोट धरून हसाल

मुलाने असा एकच डायलॉग मारला की बाबांनीही त्याला मारणं थांबवलं.

    मुंबई, 28 मे : लहान मुलांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Child viral video). सध्या अशाच एका चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चिमुकल्याची त्याच्या बाबांनी चांगलीत धुलाई केली आहे. पण बाबांच्या मारावर या छोट्याने आपला डायलॉगवार केल आहे. वडिलांनी मारताच रडत रडतच त्याने असा डायलॉग मारला आहे की तो ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल (Child funny video). बऱ्याच लहान मुलांना आईवडिलांनी मारल्यानंतर त्यांना लगेच राग येतो. रडत रडत रागात काही मुलं पालकांना उत्तरही देतात. अशाच मुलांपैकी हा एक चिमुकला. ज्याच्या वडिलांनी मारताच तो बिनधास्तपणे छाती ताणून त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्याने असा डायलॉग मारला त्याच्या डायलॉगवारपुढे बाबांना आपल्या काठीचा वार थांबवावाच लागला. फक्त आपल्या डायलॉगनेच त्यांने मारकुट्या बाबांवर मात केली. असा या चिमुकल्याने काय डायलॉग मारला पाहुयात. हे वाचा - अर्रsss! नवरीबाईला वरमाला घालताच निसटली नवरदेवाची पँट; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता हा छोटासा मुलगा आईच्या मांडीवर बसला आहे. मोठमोठ्या हुंदके देत तो रडतो आहे. त्याचे बाबा हातात काठी घेऊन त्याला मारताना दिसत आहेत. मुलगा रडत रडत वडिलांच्या डोळ्यात डोळे टाकून बघतो. बराच वेळ तो पाहून घेतो. बाबा काही मारणं थांबवत नाहीत हे समजल्यावर तो डायलॉग मारतो. बाबांनी काठीचा मारत देताच मैं झुकेगा नाही (Main Jhukega Nahi)  असं बोलतो. जसे त्याचे बाबा त्याला मारतात तसं तो हाच डायलॉग मारतो. चिमुकल्यावर पुष्पाचा फिव्हर  (Pushpa Fever) चढल्याचा दिसतो आहे. पुष्पा  (Pushpa)  फिल्ममधील हा फेमस डायलॉग. फिल्ममध्ये पुष्पाची भूमिका साकारणारा अभिनेता अल्लु अर्जुनचा हा डायलॉग अद्यापही कित्येकांच्या तोंडावर आहे. लेकाचं बोलणं ऐकून आई आणि वडील दोघंही हसू लागता. शेवटी आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या लेकाला मिठीत घेऊन. बाबांना मारण्यापासून रोखताना दिसते. हे वाचा - आईबाबांना VIDEO CALL करत लेकाने विमानातून मारली उडी; अंगावर काटा आणणारं दृश्य पूर्णिया तक फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Funny video, Parents and child, Small child, Viral, Viral videos

    पुढील बातम्या