मराठी बातम्या /बातम्या /Viral /'पापा की परी'चा 'कार'नामा; टायरमध्ये भरली तब्बल 6 हजारांची हवा

'पापा की परी'चा 'कार'नामा; टायरमध्ये भरली तब्बल 6 हजारांची हवा

लेकीचा प्रताप पाहून बाबालाही बसला धक्का.

लेकीचा प्रताप पाहून बाबालाही बसला धक्का.

लेकीचा प्रताप पाहून बाबालाही बसला धक्का.

मुंबई,  14 ऑक्टोबर : लेक म्हणजे वडिलांची सर्वात लाडकी असते (Father daughter story). म्हणून तर तिला पापा की परी (Papa ki pari) म्हणतात. आपल्या या लाडक्या परीसाठी बाबा काहीही करू शकत. पण काही वेळा पापाची ही परी असं काही करते ही वडिलांनाही धक्का बसतो. सध्या अशाच एका बापलेकीची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. लेकीचा प्रताप पाहून वडिलांनाही डोक्याला हात लावला.

एका मुलीने आपल्या गाडीत हवा भरली (6 Thousand Air In Car Tyre). पण तिने हवेची जी किंमत सांगितली तो आकडा ऐकून तिचे वडीलही हादरले. लेकीचा कारनामा पाहून वडिलांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. या मुलीने आपल्या वडिलांसोबतच्या संवादाचा स्क्रिनशॉट आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होतो आहे.

Dublin Lives च्या रिपोर्टनुसार तिने आपल्या वडिलांना व्हॉईस मेसेज पाठवला. मी आपल्या कारच्या टायरमध्ये 6 हजार रुपयांची हवा भरली हा दर योग्य आहे का?, असं तिने विचारलं. आकडा पाहून तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला.

हे वाचा - Parenting : मुलाचे संगोपन करताना तुम्हीही करत नाही ना या 5 चुका? अशी घ्या काळजी

तिच्या वडिलांनी तिला रागात विचारलं, 6 हजाराची हवा? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? खरंच तू हवेसाठी सहा हजार रुपये दिले?

यावर उत्तर देताना तिने टायरमध्ये आपण अशीतशी नाही, तर प्रीमिअम हवा भरल्याचं सांगितलं.  गाडीच्या मागच्या टायरमध्ये हवा नव्हती. ती गॅरेजमध्ये गेली तेव्हा तिला प्रीमिअमर हवेसाठी सहा हजार रुपये मागितले, असं ती वडिलांना म्हणाली.

प्रीमिअम हवेबाबत ऐकून तर वडिलांचा राग अधिकच वाढला. ते म्हणाले, ही कोणती हवा आहे, जी प्रीमिअम आहे. जगात एकच हवा आहे आणि त्यातच माणसं श्वास घेत आहेत.

हे वाचा - Shocking! म्हणे, भूत हिच्यासोबत करतो सेक्स; ऑर्गेझममुळेच मरण्याची गायिकेला भीती

ही तरुणी आपल्या वडिलांसोबत प्रँक करत होती. यानंतर पुढे नेमकं काय झालं, हे माहिती नाही. पण हा स्क्रीनशॉर्ट जोरदार व्हायरल होतो आहे.

First published:

Tags: Car, Parents and child, Viral, Viral news