Home /News /viral /

डोक्याची शस्त्रक्रिया झालेल्या लेकीला धीर देण्यासाठी वडिलांनी केलं असं काही, VIRAL फोटो पाहून सर्वच भावुक

डोक्याची शस्त्रक्रिया झालेल्या लेकीला धीर देण्यासाठी वडिलांनी केलं असं काही, VIRAL फोटो पाहून सर्वच भावुक

सोशल मीडियावर (social media) अनेक प्रकारचे फोटो (photo) आणि व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. कधी-कधी हे फोटो हृदयाला भिडतात आणि लोकांना भावुक (emotional) करतात.

     मुंबई, 27 जानेवारी-   सोशल मीडियावर (social media) अनेक प्रकारचे फोटो (photo) आणि व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. कधी-कधी हे फोटो हृदयाला भिडतात आणि लोकांना भावुक (emotional) करतात. कधी एखाद्या माणसाशी संबंधित तर कधी प्राण्यांशी संबंधित फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. सध्या असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक माणूस आपल्या मुलीसोबत दिसत आहे. पण फोटोमागील कहाणी ऐकून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. ट्विटर युजर फिगेनने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात बाप-लेकीचा भावनिक फोटो दिसत आहे. मुलीच्या डोक्यावर (hair) केस नसून टाके घातल्याच्या खुणा आहेत, तर तिच्या वडिलांच्या डोक्यावरही केस नसून त्यांच्या डोक्यावरही अशाच खुणा आहेत. वडील आपल्या मुलीच्या डोक्याला डोकं टेकवून उभे आहेत. या फोटोसोबत खूप भावूक कॅप्शन लिहिलंय. मुलीच्या ब्रेन सर्जरीचा वडिलांसोबतचा व्हायरल फोटो (Daughter brain surgery viral photo with father), अस लिहिलं आहे. परंतु न्यूज18 हा फोटो खरा असल्याचा दावा करत नाही, कारण हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती किंवा त्याच्या मुलीबद्दल कोणतीही माहिती न्यूज 18 ला मिळालेली नाही. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये (photo caption) लिहिलं आहे की, “जेव्हा लहानग्या मुलीवर मेंदूची शस्त्रक्रिया झाली तेव्हा तिचे केस कापावे लागले. नंतर तिच्या वडिलांनी पण तिच्यासारखेच स्वतःचे केस कापून घेतले. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.” व्हायरल झालेल्या फोटोनुसार, मुलीचं मनोबल वाढवण्यासाठी वडिलांनी केस तिच्यासारखेच कापले आणि डोक्यावर टाके घातल्याची खूण देखील केली. सोशल मीडियावर दोन गट- या फोटोला 7 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर 1 हजाराहून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. सोशल मीडियावर काही लोक वडिलांचे कौतुक करत आहेत, तर अनेक लोक भावूक झाल्याचंही पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे अनेक लोक या फोटोमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलंय की, कोणत्याही रुग्णालयात अर्धे केस कापून मेंदूची शस्त्रक्रिया होत नाही. दरम्यान, अनेक लोक त्या चिमुरडीबद्दल प्रेम व्यक्त करत असून तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आशीर्वाद देत आहेत.
    First published:

    Tags: Photo viral

    पुढील बातम्या