मराठी बातम्या /बातम्या /Viral /

उधाणलेल्या नदीने बळीराजाला घेतलं सामावून; निसर्गाच्या शक्तीपुढे गावकऱ्यांची मदतही अपुरी, भयावह VIDEO

उधाणलेल्या नदीने बळीराजाला घेतलं सामावून; निसर्गाच्या शक्तीपुढे गावकऱ्यांची मदतही अपुरी, भयावह VIDEO

बळीराजा नदीतून वाहत जात होता आणि समोर लोक VIDEO शूट करीत होते.

बळीराजा नदीतून वाहत जात होता आणि समोर लोक VIDEO शूट करीत होते.

बळीराजा नदीतून वाहत जात होता आणि समोर लोक VIDEO शूट करीत होते.

  • Published by:  Meenal Gangurde

उत्तर प्रदेश, 1 ऑगस्ट : सध्या देशभरात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. यादरम्यान काही ठिकाणी रस्ता खचणे, दरड कोसळल्याच्या घटनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सोशल मीडियावरुन व्हिडीओ पाहून मन सुन्न होतं. महाराष्ट्रातून आलेल्या एका व्हिडीओमध्ये तर नदीच्या पाण्यात मृतदेह वाहताना दिसून आलं आहे. हे सर्व चित्र हृदय पिळवटून टाकणारं आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातून असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोनभद्र येथील कुलडोमरीच्या पडरवा गावातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. या गावातील 55 वर्षीय शेतकरी राम कैलाश शेतात काम करण्यासाठी गेला होता. तो नदी पार करीत असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा हा व्हिडीओ आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्या कारणाने तो वाहत लांबपर्यंत निघून गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. (farmer had gone to work in the fields swept away of the river while crossing shocking video )

त्याला वाहताना पाहून अनेक गावकरी मदतीसाठी पुढे आले. अनेकांनी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र निसर्गाच्या शक्तीपुढे कोणीच काही करू शकलं नाही. यादरम्यान काहींनी या प्रसंगाचा व्हिडीओ शूट केला. जो आता व्हायरल होत आहे. समोर आपल्यातलाच एक व्यक्ती वाहत जात आहे, परंतु समोर असूनही आपण काहीच करू शकलो नाही, ही भावना त्रास देणारी आहे. निसर्गाच्या शक्तीपुढे कोणाच काहीच चालू शकत नाही असं म्हणतात.

हे ही वाचा-VIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव

" isDesktop="true" id="586877" >

शेतकरी वाहून गेल्याचं तातडीने प्रशासन आणि पोलिसांना कळविण्यात आलं. पोलीस स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शेतकऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना उधाण आलं आहे. दरम्यान अनेकांचा जीव धोक्यात आहे.

आतापर्यत अनेक भागात अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पावसादरम्यान नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

 

First published:

Tags: Farmer, Shocking viral video, Viral video.