अबब... शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 4.25 किलोचा आंबा; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

अबब... शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 4.25 किलोचा आंबा; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

यापूर्वी 2009 मध्ये फिलिपीन्समधील (Philippines) एका शेतकऱ्याने (Farmers) 3.435 किलो वजनाच्या आंब्याचे उत्पादन घेतले होते.

  • Share this:

फिलीपिन्स, कोलंबिया, 5 मे: या उन्हाळ्यात (Summer) आंब्याचा (Mango) हंगाम सुरु होताच कोलंबिया येथील शेतकरी दांपत्याने आंबा प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटेल अशी आश्चर्यकारक भेट आणली आहे. या शेतकऱ्याने सुमारे 4.25 किलो आंबा फळाचे उत्पादन घेतले असून त्यांच्या या कामगिरीची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे.

कोलंबियामधील (Colombia) गुआयाटा येथील बॉयका परिसरातील सॅन मार्टिन येथे जर्मन आरलॅंडो नोवोआ आणि रिना मारिया मार्राकून यांनी त्यांच्या बागेत उत्पादित केलेल्या मोठ्या वजनाच्या आंब्याची 29 एप्रिलला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

यापूर्वी 2009 मध्ये फिलिपीन्समधील (Philippines) एका शेतकऱ्याने (Farmers) 3.435 किलो वजनाच्या आंब्याचे उत्पादन घेतले होते. या रेकॉर्डनंतर कोलंबियातील शेतकऱ्याने त्यांच्यापेक्षा अधिक वजनाच्या आंब्याचे उत्पादन घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याबाबात जर्मन म्हणाले की आम्ही हे विजेतेपद जिंकून जगाचे या विक्रमाकडे लक्ष वेधले आहे. कोलंबियातील नागरिक ग्रामीण भागावर प्रेम करणारे, नम्र आणि कष्टाळू आहेत. अत्यंत प्रेमळपणाने ते शेती करतात त्यामुळे या जमिनीतून उत्तम फळे मिळतात. जगातील सर्व नागरिक महामारीमुळे (Pandemic) त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर हे वजनदार फळ लोकांना आशा आणि आनंदाचा संदेश देते.

वाचा: VIDEO: आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहाशीच भिडली आई; पाहा झेब्राच्या पिल्लाच्या सुटकेचा थरार

जर्मन मुलीने या आंब्याचे आकारमान पाहिल्यानंतर जागतिक विक्रमासाठी इंटरनेटवर अधिक सर्च केल्याचे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटलं आहे. या आंब्याचे वजन केल्यानंतर हा आंबा जगातील सर्वात मोठा असल्याचा विश्वास पटला आणि त्याची वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद झाली.

जर्मन यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ला सांगितले की ग्वायाटुनेच्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये असणारे समर्पण, कष्ट, प्रयत्न आणि निसर्गा विषयीचे प्रेम हे गुण आमच्यामध्ये आमच्या पालकांकडून आले आहेत. कुटुंबाने हा स्वादिष्ट आणि निरोगी असा संपूर्ण आंबा खाऊन या विक्रमाचा आनंद साजरा केल्याचे जर्मन यांनी सांगितले. गुआयाटा येथील इतिहास घडवणाऱ्या या फळाची त्याच्या स्मरणार्थ प्रतिकृती तयार करुन ती महापालिकेस दान करण्यात आली.

जर्मन यांच्या म्हणण्यानुसार, हा महापालिकेचा दुसरा विश्व विक्रम आहे. यापूर्वी 2014 मध्ये 3,1999 चौरस मीटर इतक्या प्रदीर्घ क्षेत्रावर नैसर्गिक फुलांच्या सहाय्याने कारपेट किंवा गालिचा (Carpet) तयार करण्यात आला होता. त्याची देखील वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद झालेली होती. हा विक्रम यानिमित्ताने महापालिकेने मोडला.

गुआयाटा हा प्रदेश शेतीसाठी (Agriculture) प्रसिध्द आहे. येथील शेतकरी आपल्या कौटुंबिक वापरासाठी कॉफी, अरेपा, मोगोला आणि आंब्याचे उत्पादन घेतात. मात्र हे उत्पादन गरजेपुरते आणि अत्यल्प प्रमाणात असते.

First published: May 5, 2021, 10:22 AM IST

ताज्या बातम्या