Home /News /viral /

14 दिवस एकानेही साधी अंडरवेअरही बदलली नाही; घाणेरडे कपडे घालूनच फॉरेन फिरत होतं कुटुंब कारण...

14 दिवस एकानेही साधी अंडरवेअरही बदलली नाही; घाणेरडे कपडे घालूनच फॉरेन फिरत होतं कुटुंब कारण...

एक कुटुंब परदेशात फिरायला गेलं पण घातलेल्या कपड्यांवर त्यांनी 14 दिवसांची सुट्टी घालवली.

    लंडन, 06 ऑगस्ट : कुठे फिरायला जायचं म्हटलं की सर्वात आधी येते ती कपड्यांची पॅकिंग. अगदी एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरायचं म्हटलं तरी आपण बरेच कपडे घेतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक कुटुंब फॉरेन ट्रिपवर गेलं. पण संपूर्ण फॉरेन टूर त्यांनी घातलेल्या कपड्यांवरच केली. दुर्गंधीयुक्त कपड्यांसहच 14 ते परदेशात फिरत होते. अगदी साधी अंडरवेअरही त्यांनी बदलली नाही. यूकेच्या नॉटिंघमशायरसमधील निकोला कॉकेने आपलं कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत तुर्कस्तानात फिरायला गेली. एकूण 11 जण होते, ज्यांनी 14 दिवसांच्या फॉरेन ट्रिपवर गेले होते. 14 दिवसांसाठीचं त्यांनी आपल्याला गरजेचं असलेलं सामान पॅक केलं. बॅगेत त्यांनी कपडेही घेतले होते. पण जेव्हा ते तुर्कस्तानात पोहोचले तेव्हा मात्र जे कपडे यूकेहून घालून ते गेले होते,  त्याच कपड्यांवर 14 दिवस राहिले. हे वाचा - अर्रर्रर्र! Underwear न घालताच रेसच्या मैदानात उतरला खेळाडू; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO आता हे या कुटुंबाने मुद्दामहून केलं नाही तर त्यांच्यावर तशी वेळच ओढावली. आपली 14 दिवसांची सुट्टी त्यांना आहे त्याच कपड्यांवर घालवावी लागली याचं कारणीभूत म्हणजे एअरलाइन्स. यूकेहून ज्या एअरलाइन्स कंपनीच्या फ्लाइटने हे कुटुंब गेलं त्या एअरलआन्सने या कुटुंबाचं सामानच त्यांना पाठवलं नाही. तुर्कस्तानच्या एअरपोर्टवर हे लोक आपल्या सामानाची प्रतीक्षा करत होते, तेव्हा आपलं लगेज यूकेतच राहिल्याचं त्यांना समजलं. नॉटिंघमशायर पोस्टच्या रिपोर्टनुसार निकोलाने सांगितलं की, "आमचं सामानच आलं नाही हे समजलं तेव्हा आम्ही खूप वैतागलो. दोन दिवसांत आमचं सामान पाठवलं जाईल, असं आश्वान आम्हाला देण्यात आलं पण तसं झालंच नाही. संपूर्ण ग्रुपला 14 दिवसांची सुट्टी सामानाशिवायच घालवाली लागली. एकच जोडी कपडे घातले. अंडरवेअरही एकच होती जी आम्ही रात्री धुवायचो.  एअरलाइन्सच्या या बेजबाबदारपणामुळे सर्वांना समस्यांचा सामना करावा लागला" हे वाचा - सात वर्षांत पहिल्यांदाच ऑफिसला पोहोचायला 20 मिनिटं झाला उशीर; कर्मचाऱ्याची गेली नोकरी त्यांच्या ट्रॅव्हल एजेंटने ट्रिपचं इन्श्यूरन्स केलं होतं. त्यामुळे भरपाई म्हणून त्यांना 14,400 रपये मिळाले. पण ही ट्रिप त्यांची सर्वात वाईट ट्रिप होती. ट्रिपसाठी त्यांनी दोन वर्षे सेव्हिंग केली होती पण त्याचा परिणाम असा झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या