Home /News /viral /

हे फक्त भारतातच होऊ शकतं! व्हिडीओ कॉलवर उरकले लग्नाचे विधी, पाहा VIDEO

हे फक्त भारतातच होऊ शकतं! व्हिडीओ कॉलवर उरकले लग्नाचे विधी, पाहा VIDEO

भारतीय लग्नाचे विधी म्हटलं की त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती, परंपरा असतात. लग्नाआधीच्या विधी उरकण्यातही वेळ खर्ची होतोच. मग एकमेकांपासून दूर राहणाऱ्या कुटुंबातील लग्नाचे विधी पार पाडणं काही वेळा कठीण होऊन बसतं. अशावेळी कामी येतात ते टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया. कसं ते इथे वाचा.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 फेब्रुवारी : भारतीय माणसांची हुशारी अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळते. सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा हे कुणी भारतीयांकडून शिकावं. तंत्रज्ञानाचाही जुडाड करत आपण आपल्या सोयीनुसार वापर करुन घेत असतो. याच गोष्टीची प्रचिती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे आली आहे. या भारतीय कुटुंबाने लग्नाआधी पार पडणारा ‘रोका विधी’ चक्क व्हिडीओ कॉलवर पूर्ण केला. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की नवरा आणि नवरीला वेगवेगळ्या स्मार्टफोनवरून व्हिडीओ कॉल करण्यात आला आहे आणि हे दोन्ही फोन वेगवेगळ्या चौरंगावर विराजमान करण्यात आले आहेत. एवढच नाही तर अगदी मुलीच्या डोक्यावर ओढणी ठेवल्याप्रमाणे एक महिला नवरी असणाऱ्या फोनवर ओढणी ठेवते. तर फोनला टिळा लावलेला देखील दिसतो आहे. हा व्हिडीओ नक्की कुणाच्या कुटुंबातील किंवा कोणत्या शहरातील आहे हे अद्याप समजलेलं नाही. मात्र एखाद्या गुजराती कुटुंबातील हा व्हिडीओ असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा- अजब प्रेम की गजब कहानी! नवरा-नवरीने हातात 7 महिन्याचं बाळ घेऊन उरकलं लग्न) राहुल निनगोट नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जातोय. यामध्ये या युजरने मेट्रोपार्कला टॅग करत म्हटलं आहे की ‘बघा तुम्ही काय केलं?’ मेट्रोपार्क या सीरीजमध्ये देखील अमेरिकेतील न्यूजर्सी याठिकाणी राहणारं पटेल कुटुंबीय विविध तंत्रज्ञानांचा वापर करत असतात. आपल्या मुलांना भारतीय संस्कारांची शिकवण देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कदाचित या ट्विटर युजरने या व्हिडीओ शेअर करताना मेट्रोपार्कला टॅग केलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या