मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: सासरी जायला तयार नव्हती नवरी; घरच्यांनी हातपायाला धरून उचललं अन्..., कधीच पाहिली नसेल अशी पाठवणी

VIDEO: सासरी जायला तयार नव्हती नवरी; घरच्यांनी हातपायाला धरून उचललं अन्..., कधीच पाहिली नसेल अशी पाठवणी

Viral Video of Bride: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पाठवणीवेळी नवरीबाई इतकी रडायला लागते की तिला नवरदेवासोबत पाठवण्यासाठी घरचे जबरदस्ती ओढून बाहेर आणतात.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 डिसेंबर : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडिओ (Wedding Videos) व्हायरल होत राहतात. सध्या एका नवरीबाईचा एक असा व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Bride) होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाठवणीच्यावेळी तुम्ही नवरीला रडताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र काहीवेळा नवरीबाईचा हाय व्होलटेज ड्रामाही (Bride High Voltage Drama) पाहायला मिळतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पाठवणीवेळी नवरीबाई इतकी रडायला लागते की तिला नवरदेवासोबत पाठवण्यासाठी घरचे जबरदस्ती ओढून बाहेर आणतात. हे पाहून सगळेच हैराण झाले.

जादू पाहताच हसून लोटपोट झाला चिंपांझी; Viral Video पाहून तुम्हीही खळखळून हसाल जा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की लग्नानंतर जेव्हा पाठवणीची वेळ येते तेव्हा नवरीबाई नवरदेवासोबत जाण्यास नकार देते. आधी ती भरपूर रडते आणि नंतर मोठमोठ्याने ओरडूही लागते. नवरी काही केल्या नवरदेवासोबत जायला तयार नसल्याने घरच्यांनी तिचे हातपाय पकडून तिला बाहेर आणलं आणि जबरदस्ती कारमध्ये बसवून तिची पाठवणी केली.

View this post on Instagram

A post shared by 69Flix (@69.flix)

आणखी एक विशेष बाब म्हणजे घरचे लोक जेव्हा तिला कारमध्ये बसवत होते तेव्हा तिने आतमध्ये बसण्यास नकार दिला. तरीही घरच्यांनी जबरदस्ती तिला कारमध्ये बसवलं, जेणेकरून तिने आपल्या सासरी जावं. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ 69.flix नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

VIDEO: प्रेयसी सोडून गेल्याने भावुक झाला युवक; मग गर्लफ्रेंडला अशी घडवली अद्दल

हा व्हिडिओ अपलोड होताच चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, तिला टॅग करा, जिची अशीच अवस्था होणार आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Bride, Wedding video