मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : पिझ्झा बेक होता होता त्याखाली शिजला साप! ओव्हन उघडल्यानंतर बेशुद्ध झाली तरुणी

VIDEO : पिझ्झा बेक होता होता त्याखाली शिजला साप! ओव्हन उघडल्यानंतर बेशुद्ध झाली तरुणी

कधी ओव्हनमध्ये सापाला शिजताना पाहिले आहे? पाहा धक्कादायक VIDEO.

कधी ओव्हनमध्ये सापाला शिजताना पाहिले आहे? पाहा धक्कादायक VIDEO.

कधी ओव्हनमध्ये सापाला शिजताना पाहिले आहे? पाहा धक्कादायक VIDEO.

  • Published by:  Priyanka Gawde

नॉर्थ केरोलिना, 06 जानेवारी : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे अशी घटना घडली की सर्वच आश्चर्यचकित झाले आहे. येथील एका कुटुंबाने बेकिंगसाठी पिझ्झा ओव्हनमध्ये ठेवला होता. मात्र ओव्हन बंद केल्यानंतर त्यात त्यांना एक साप सापडला. या सगळ्या प्रकाराचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

नॉर्थ कॅरोलिना येथील कपल अंबर हेल्म आणि रॉबर्ट रात्री पिझ्झाला गरम करत होते. त्याच्या लक्षात आले की त्याच्या ओव्हनमधून धूर निघत आहे आणि एक विचित्र वास येत आहे. जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा काय होते ते पाहून बेशुद्ध झाला. ओव्हनच्या तळाशी मृत साप पडला होता.

वाचा-फेसबुक LIVE करतानाच झाला भीषण अपघात, भयानक VIDEO आला समोर

अंबरने एक स्थानिक चॅनल डब्ल्यूआरएएलशी बोलताना, "ओव्हनच्या आतून धूर निघू लागला. मी घरातल्या सर्व लोकांना दूर रहाण्यास सांगितले. मी ओव्हनमध्ये पाहिले तेव्हा एक मृत साप पडला होता.", असे सांगितले. तर, रॉबर्टने, "तो शांत आणि अत्यंत भितीदायक होता. ओव्हनमध्ये मृत साप पाहून तो एक भयानक स्वप्नासारखा होता.", असे सांगितले. या लोकल न्यूज चॅनेलनं दिलेल्या माहितीनुसार हा साप सुमारे 18 इंच लांब होता.

वाचा-पापणी लवताच पडला 100 फूटी उंच टॉवर, पाहा थरारक VIDEO

" isDesktop="true" id="427754" >

वाचा-दारु पिऊन तरुणाचा कोब्रासोबत नागीण डान्स, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

सीएनएनशी बोलताना अंबरने सांगितले की, नाताळादरम्यान त्यांनी ओव्हनचा शेवटचा वापर केला होता. दरम्यान रात्री पिझ्झा गरम करताना त्यांनी लक्ष दिले नाही. पिझ्झा बाहेर काढण्यासाठी ओव्हन ओपन केल्यानंतर त्यांना आता मृत साप सापडला. दरम्यान अंबरने साप पकडणाऱ्यांना बोलावले आणि घरात आणखी साप आहेत का ते पाहण्यासाठी घर तपासले.

First published: