Home /News /viral /

चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण साधं खरचटलंही नाही; दीड वर्षांच्या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण

चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण साधं खरचटलंही नाही; दीड वर्षांच्या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण

Girl child not even scratched Falling from third floor : तिसऱ्या मजल्यावरून कोसळणाऱ्या या दीड वर्षांच्या चिमुकलीचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.

    डेहराडून, 25 मे : काहींना चालता-बोलता, हसता-खेळता मृत्यू गाठतो तर काहींसोबत जीवघेणी दुर्घटना होऊनही त्यांना काहीच होत नाही. अशीच एक चमत्कारिक घटना सध्या चर्चेत आहे. ज्यात अवघी दीड वर्षांची चिमुकली तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण तिला साधं खरचटलंही नाही. तिचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील ही घटना आहे (Girl child not even scratched Falling from third floor). एखादी व्यक्ती पहिल्या मजल्यावरून कोसळली तरी तिला काही ना काही दुखापत होतेच. हातपाय तुटतं, डोकं फुटतं. पण ही दीड वर्षांची चिमुकली मात्र याला अपवाद ठरली. शांभवी बर्तवाल असं या चिमुकलीचं नाव आहे.  शांबवी घरात खेळता खेळता तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून थेट रस्त्यावर कोसळली.  तिचं नशीब चांगलं म्हणा किंवा याला चमत्कार म्हणा. इतक्या मोठ्या दुर्घटनेतून ही चिमुकली बचावली. पण तिच्या शरीरावर एक छोटीशीही जखम झाली नाही. हे वाचा - बॅट, तवा, काठीने दररोज बेदम मारहाण करायची बायको; वैतागलेल्या प्रिन्सिपल नवऱ्याने अखेर...; CCTV मध्ये भयानक दृश्य कैद या दुर्घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. न्यूज हाईटच्या या व्हिडीओत पाहू शकता ही चिमुकली कशी कोसळली आहे. व्हिडीओ पाहूनच आपल्या काळजाचा ठोका चुकतो. शांभवीला इमारतीतून रस्त्यावर पडलेलं पाहताच, जो तो शांभवीच्या दिशेने धावला. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिचं वय आणि ज्या मजल्यावरून ती कोसळली ते पाहता या चिमुकलीला गंभीर दुखापत झाली असावी असं वाटेल. पण तसं काहीच झालं नाही. हे वाचा - Shocking Video - मिठी मारत थेट मगरीलाच किस करायला गेला तरुण; धक्कादायक शेवट रुग्णालयात तिच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. शांभवीचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट नॉर्मल आले. ती पूर्णपणे ठणठणीत होती. तिच्या शरीरावर कुठेच साधं खरचटलंही नाही आहे. एकही जखम तिच्या शरीरावर नाही.  म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. त्याचा प्रत्यय या व्हिडीओतून दिसून येतो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Uttarakhand, Viral, Viral videos

    पुढील बातम्या