जाणून घ्या हैदराबाद एन्काऊंटरच्या व्हायरल फोटोमागचं सत्य

जाणून घ्या हैदराबाद एन्काऊंटरच्या व्हायरल फोटोमागचं सत्य

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण तो फोटो 2015 मध्ये झालेल्या आंध्रप्रदेशातील चकमकीचा असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 डिसेंबर : देशाला हादरवून टाकणाऱ्या हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले. तेलंगणा पोलीस आरोपींना घटनास्थळी तपासासाठी घेऊन गेले होते. तेव्हा आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत चकमकीवेळी झालेल्या गोळीबारात चारही आरोपी जागीच ठार झाले.

एन्काऊंटरनंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींचा असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोत तीन मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला फोटो हैदराबाद एन्काऊंटरमधील नसल्याचं समोर येत आहे. हा फोटो 2015 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमधील फोटो आहे. तेव्हा 20 चंदन तस्करांना एन्काऊंटरमध्ये ठार केलं होतं.

गुगलवर इमेज सर्च केल्यानंतर 2015 मध्ये अनेक वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये हा फोटो दिसतो. त्या बातम्यांनुसार सेशाचलम जंगलात रक्त चंदनाची झाडे कापत असताना पकडलेले लोक एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते.

हैदराबादमधील एन्काऊंटरचा फोटो

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hyderabad
First Published: Dec 6, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या