मराठी बातम्या /बातम्या /Viral /

महिला दिनाला फ्रीमध्ये शूज देतय Adidas? जाणून घ्या WhatsAppवर फिरणाऱ्या त्या मेसेजचं सत्य

महिला दिनाला फ्रीमध्ये शूज देतय Adidas? जाणून घ्या WhatsAppवर फिरणाऱ्या त्या मेसेजचं सत्य

व्हॉट्सअॅपवर (WhatsApp viral) लोकांना एक मेसेज येत आहे. यात असा दावा केला जात आहे, की महिला दिनानिमित्त अदिदास मोफत शूज देत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 08 मार्च : ऑनलाईन स्कॅम (online scam) आणि फसवणूकीचे (online fraud) प्रकार जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशात आता हॅकर्सनी महिला दिनाचा (women’s day 2021) फायदा घेत फसवणुकीचा आणखी एक नवीन प्रकार आणला आहे. व्हॉट्सअॅपवर (WhatsApp viral) लोकांना एक मेसेज येत आहे. यात असा दावा केला जात आहे, की महिला दिनानिमित्त अदिदास मोफत शूज देत आहे. असा फसवणुक करणारा मेसेज व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. हॅकर्स अनेकदा फसवणुकीसाठी फेसबुक, ट्विटर आमि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात.

अशात तुम्हाला असाच अदिदासचे शूज फ्रीमध्ये देण्याचा दावा करणार मेसेज आला असेल, तर या जाळ्यात अडकू नका. कारण हा मेसेज खरा नाही. असं काही खरंच असतं, तर याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या अधिकृत साईटवरुन मिळाली असती.

अशी समजते फेक वेबसाईट -

प्रत्येक फेक वेबसाईटवर व्याकरण किंवा चित्रामध्ये काही चुका असतात. सध्या व्हायरल मेसेजविषयी बोलायचं झाल्यास यात अदिदासच्या स्पेलिंगमध्ये डबल SS पाहायला मिळत आहे. मात्र, अदिदासच्या स्पेलिंगमध्ये खरतर एकच S वापरला जातो. या फेक मेसेजच्या URL मध्ये आपल्याला ‘vapp.buzz/adidass’ असं लिहिलेलं दिसतं. याच कारणामुळे ही वेबसाईट फसवणुकीच्या उद्देशानं बनवली गेली असल्याचं स्पष्ट होतं.

याशिवाय ऑफरच्या पेजवर अदिदास नाही तर व्हॉट्सअॅपचा लोगो आहे. यामुळे हे लक्षात येत की हा दावा खोटा आहे. त्यामुळे या Women’s day ला स्वतःला सुरक्षित ठेवा आणि अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्याच्यातील या बारीक गोष्टींवर नक्की लक्ष ठेवा. नाहीतर तुम्हीदेखील ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होऊ शकता.

First published:

Tags: Fake, Money fraud, Online fraud, Whatsapp, Whatsapp News