मराठी बातम्या /बातम्या /Viral /'या' आलिशान वाटणाऱ्या हॉटेलमध्ये पैसे देऊनही मिळत नाही रूम; भव्य इमारतीचं सत्य आहे निराळं

'या' आलिशान वाटणाऱ्या हॉटेलमध्ये पैसे देऊनही मिळत नाही रूम; भव्य इमारतीचं सत्य आहे निराळं

सोर्स : Google

सोर्स : Google

ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नच्या बाहेर व्हिक्टोरिया राज्यात एक हॉटेल आहे. त्याचं नाव हॉटेल इस्ट लिंक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : पर्यटनस्थळी चांगली हॉटेल्स मिळाली, तर सहल यशस्वी होते, असं म्हटलं जातं. जगात अशी अनेक मोठी हॉटेल्स आहेत, जिथे जाणं आणि राहणं पर्यटकांना आवडतं. हॉटेल कितीही महागडं असलं तरी रूम उपलब्ध असते. पर्यटनाचा हंगाम असेल तर काही वेळा रूम्स मिळण्यात अडचणी येतात; पण ऑफ सीझनमध्ये रूम्स सहज उपलब्ध होतात; पण तुम्हाला माहिती आहे का, की जगात एक असं हॉटेल आहे, की जिथे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी रूम मिळणं अशक्य आहे. तुम्ही कितीही पैसे द्यायला तयार असलात, तरी तुम्हाला या हॉटेलमध्ये रूम मिळणं दुरापास्त आहे.

    'ऑडिटी सेंट्रल' या वेबसाइटच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नच्या बाहेर व्हिक्टोरिया राज्यात एक हॉटेल आहे. त्याचं नाव हॉटेल इस्ट लिंक आहे. हे एखाद्या मोठ्या हॉटेलप्रमाणे दिसतं.

    अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय?

    या हॉटेलच्या अनेक रूम्स आणि अन्य गोष्टी इतर हॉटेल्सपेक्षा चांगल्या आहेत; पण जेव्हा या हॉटेलबाबतचं सत्य समजतं तेव्हा पर्यटकांना धक्का बसतो. कारण या भव्य इमारतीत हॉटेल अस्तित्वातच नाही; मात्र त्याच्या बाह्य स्वरूपावरून आतमध्ये आलिशान हॉटेल असावं असं वाटतं.

    खरं तर हे हॉटेलच नाही

    कॅलम मार्टिन नावाच्या स्थानिक कलाकाराने या हॉटेलची रचना केली आणि 2007मध्ये त्याचं उद्घाटन झालं. 20 मीटर उंच, 12 मीटर रुंद आणि पाच मीटर जाडी असलेलं हे हॉटेल प्रत्यक्षात हॉटेल नाही. या कलाकाराने त्यावर हॉटेलचा फलक लावला, डिझाइनसाठी खिडक्या बनवल्या आणि त्या रंगवल्या. रात्रीच्या वेळी खिडक्यांमध्ये दिवे लावले. त्यामुळे या हॉटेलच्या समोरून कोणीही जातं तेव्हा त्यांना ते खरंच हॉटेल वाटतं; मात्र आतून ही इमारत रिकामी असून, त्यात काहीच नाही. या इमारतीत प्रवेश करणंही अशक्य आहे. या इमारतीची उभारणी केवळ सौंदर्यासाठी केली गेली आहे.

    2000मध्ये सुचली होती बनावट हॉटेल उभारण्याची कल्पना

    हे बनावट हॉटेल उभारण्याची कल्पना कॅलमच्या डोक्यात 2000 साली आली होती. ही इमारत एखादं थीम पार्क किंवा चित्रपटाच्या सेटप्रमाणे भासते. या हॉटेलची उभारणी एका मोकळ्या जागेवर करण्यात आली असून, त्याच्या आसपास काही नाही.

    इमारतीवर लाल रंगाने काढण्यात आलेला हॉटेलचा लोगो सर्वांचं लक्ष वेधून घेतो. कॅलम त्याच्या या अनोख्या कलाकृतीसंदर्भात सांगतो, की 'हे दिसायला अनोखं वाटतं; पण एखादी वस्तू एखाद्या विचित्र ठिकाणी ठेवली तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.'

    First published:
    top videos

      Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Viral