या बाळाला खरंच आहे तिसरा डोळा? वाचा या VIRAL VIDEO मागचे सत्य

या बाळाला खरंच आहे तिसरा डोळा? वाचा या VIRAL VIDEO मागचे सत्य

या व्हिडीओमध्ये एका बाळाला तीन डोळे असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यांची हालचाल अगदी एकसारखी दिसत आहे.

  • Share this:

बर्लिन, 17 जुलै : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हे फेकही असतात, मात्र तरी सर्व समाजमाध्यमांवर ते व्हिडीओ फिरत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, ती डोळे असलेल्या बाळाचा. या व्हिडीओमध्ये एका बाळाला तीन डोळे असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यांची हालचाल अगदी एकसारखी दिसत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की, या मुलाच्या कपाळावर तिसरा डोळा आहे. ज्याची हालचाल इतर दोन डोळ्यांप्रमाणे होताना दिसत आहे. त्यामुळं मिरॅकल बेबी या नावाने या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जर्मनीमधला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओ मागचे सत्य समोर आले.

वाचा-100 फुटांवरून खाली पडला 2 वर्षांचा चिमुकला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

वाचा-खाण्यावरून तीन हत्ती भिडले, जबरदस्त लढाईचा पाहा दुर्मीळ VIDEO

एका व्हिडीओ एडिटरने हा व्हिडीओ एडिट केला असल्याचे सांगितले आहे. एडिट करून एक डोळा कपाळावर लावण्यात आला आहे, आणि मोशन इफेक्ट देऊन तिसऱ्या डोळ्याची हालचाल इतर दोन डोळ्यांप्रमाणेच होत आहे. याआधीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. मात्र फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ फेक असून एडिट केला असल्याचे कळत आहे.

वाचा-एका फोटोसाठी बापानं लेकाला खोल दरीमध्ये लटकवलं! धक्कादायक VIDEO VIRAL

Published by: Priyanka Gawde
First published: July 17, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या