Home /News /viral /

खरं की खोटं? रिझर्व्ह बँकेनं जारी केली एक हजाराची नवी नोट, फोटो VIRAL

खरं की खोटं? रिझर्व्ह बँकेनं जारी केली एक हजाराची नवी नोट, फोटो VIRAL

नोटबंदीमध्ये 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता एक हजार रुपयांच्या नव्या नोटेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 04 मार्च : नोटबंदीनंतर देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर सरकारने 10,20,50, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. दरम्यान, गेल्या काही दिवसांत 1 हजार रुपयांची नवी नोट जारी करण्यात आल्याचा दावा करत एक फोटो व्हायरल केला जात आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेला हा दावा खोटा असून 1 हजार रुपयाची नोट जारी केली नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. एक हजार रुपयांची नवी नोट जारी करण्यात आल्याचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड बोत आहे. याशिवाय 2 हजाराची नोट बंद होणार असंही चर्चेत आल्यानं एक हजार रुपयांच्या नोटेबद्दल लोकांना खरंच वाटत होतं. पण एक हजाराची नोट जारी केली नसल्याचं सांगतं दावा फेटाळून लावली. एक हजार रुपयांच्या नोटेबाबतची माहिती PIB Fact Check ट्विटरवर दिली आहे. सोशल मीडियावर रिझर्व्ह बँकेनं 1 हजार रुपयांची नोट जारी केल्याचा दावा केला जात होता. त्याचा फोटोही शेअर करण्यात येत होता. दरम्यान, शेअर होत असलेला फोटो खोटा असल्याचं आणि रिझर्व्ह बँकेनं अशी नोट चलनात आणली नसल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. PIB Fact Check मार्फत केंद्र सरकारच्या सर्व सेवा, योजना याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांची माहिती दिली जाते. तुम्हीही अशा काही अफवा असतील तर त्याची माहिती PIB Fact Check ला पाठवू शकता. त्यासाठी ज्या माहितीबद्दल शंका आहे त्याचा स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा URL लिंक 918799711259 या व्हॉटसअॅप नंबरवर किंवा pibfactcheck@gmail.com पाठवू शकता. हे वाचा : किती राहिली रे, मालगाडी अंगावरून जातानाही आजीबाई होत्या विचारत, पाहा हा VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या