Home /News /viral /

Fact Check : 'आता कोरोनापासून नागरिकांना वाचवू शकत नाही', इटलीच्या पंतप्रधानांनी टेकले हात?

Fact Check : 'आता कोरोनापासून नागरिकांना वाचवू शकत नाही', इटलीच्या पंतप्रधानांनी टेकले हात?

इटली हा देश कोरोनाच्या विळख्यात अडकला असून दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत चालली आहे. दरदिवशी 800 ते 1000 लोकांचा मृत्यू गेल्या आठवड्याभरात झाला आहे.

    मुंबई, 28 मार्च : जगात सध्या फक्त एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे ती म्हणजे कोरोनाची. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या विषाणूने आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 5 लाखांच्या घरात पोहोचली आहे. चीनमध्ये हाहाकार उडाल्यानंतर युरोपात कोरोनाने धुमाकूळ घातला. चीननंतर इटली आणि अमेरिकेला कोरोनाची मोठी झळ बसली आहे. यातच अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इटली हा देश कोरोनाच्या विळख्यात अडकला असून दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत चालली आहे. दरदिवशी 800 ते 1000 लोकांचा मृत्यू गेल्या आठवड्याभरात झाला आहे. आतापर्यंत इटलीच्या 9 हजार नागरिकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फक्त सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीच्या दृष्टीने मृतांचा हा आकडा खूपच मोठा आहे. त्यामुळे इटलीला एवढ्या लोखसंख्येवर निंयंत्रण ठेवता आलं नाही आणि इटलीच्या पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेकडं आपण यावर काहीच करू शकत नसल्याचं म्हटलं असा दावा मेसेजमध्ये केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये इटलीच्या पंतप्रधानांनी कोरोनावर आम्ही नियंत्रण मिळवू शकत नाही असं सांगितलं आहे. तसंच कोरोनाने आम्हाला मारून टाकलं आहे आणि पृथ्वीवरही त्याच्यावर कोणताच उपचार नाही. सध्या तरी आम्ही पूर्ण हात टेकले आहेत अस त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला सांगितल्याचा दावा कऱण्यात आला आहे. खरंतर इटलीबाबत अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये रस्त्यावर सिंह सोडल्याचे, पंतप्रधान रडल्याचे, रस्त्यावर मृतदेहांचा खच पडल्याचेही मेसेज आणि फोटो व्हायरल झाले होते. त्याप्रमाणेच इटलीच्या पंतप्रधांनांच्या नावाने हा मेसेज व्हायरल होत आहे. त्यात करण्यात आलेला दावा पूर्ण खोटा आहे. हे वाचा : 'घराबाहेर पडल्यास कपाळावर शिक्का, 60 दिवस जाणार नाही शाई' PHOTO VIRAL इटलीसह जगभरात हा मेसेज व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा मेसेज व्हायरल झाला आणि त्यानंतर जगभर पसरला. कोरोना व्हायरसची दहशत इतकी पसरली आहे की तो आपल्याकडे आला तर हाहाकार माजेल या भीतीनं लोकांनाही मेसेज खरा वाटत आहे. पण असं काही इटलीच्या पंतप्रधानांनी केलेलं नाही. इटलीत मृतांची संख्या वाढली असली तरी नवीन कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. ही बाब इटलीसाठी दिलासा देणारी आहे. हे वाचा : क्वारंटाइन असताना बाहेर पडलात तर खबरदार, पोलीस दररोज करणार VIDEO CALL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या