मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Fact Check : गाडीवर लिंबू-मिरची लावल्यावर 5 हजाराचा दंड? अखेर सत्य आलं समोर

Fact Check : गाडीवर लिंबू-मिरची लावल्यावर 5 हजाराचा दंड? अखेर सत्य आलं समोर

 'कार-टेम्पो किंवा ट्रकला लिंबू-मिरची लावली तर द्यावा लागेल पाच हजार रुपये दंड' अशी एक बातमी व्हायरल झाली होती.

'कार-टेम्पो किंवा ट्रकला लिंबू-मिरची लावली तर द्यावा लागेल पाच हजार रुपये दंड' अशी एक बातमी व्हायरल झाली होती.

'कार-टेम्पो किंवा ट्रकला लिंबू-मिरची लावली तर द्यावा लागेल पाच हजार रुपये दंड' अशी एक बातमी व्हायरल झाली होती.

मुंबई, 01 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक फोटो, कंटेंट आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट व्हायरल (Viral) करण्यापूर्वी त्यातली सत्यता तपासली जातेच असं नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा अशा पोस्ट अफवा किंवा खोट्या ठरतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या गाडीला दृष्ट किंवा नजर लागू नये, यासाठी गाडीवर बरेच लिंबू-मिरची (Lime-Chilly) लावतात. परंतु, आता गाडीवर लिंबू-मिरची लावली तर पाच हजार रुपये दंड (Penalty) भरावा लागेल, अशी माहिती देणाऱ्या एका कथित बातमीचा स्क्रिनशॉट (Screenshot) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'हा नियम हिंदूविरोधी आहे', असा आरोप काही लोकांनी केला आहे. याबाबत नुकतीच फॅक्ट चेक (Fact Check) अर्थात सत्यता पडताळणी केली असता, काही गोष्टी समोर आल्या आहेत. गाडीवर लिंबू-मिरची लावली तर दंड आकारण्यात येईल, अशा स्वरूपाची पोस्ट एका कथित बातमीच्या स्क्रिनशॉटसह शेअर केली जात आहे. या स्क्रिनशॉटमध्ये एका ठिकाणी 'पत्रिका' असा उल्लेख करण्यात आला आहे. 'कार-टेम्पो किंवा ट्रकला लिंबू-मिरची लावली तर द्यावा लागेल पाच हजार रुपये दंड' असं हेडिंग या बातमीचं आहे. यासोबतच लोकांच्या गाड्यांचे कागदपत्र तपासताना वाहतूक पोलिसांचा (Traffic Police) फोटोही त्यात आहे. 'आज तक'च्या फॅक्ट चेक टीमनं या व्हायरल स्क्रिनशॉटची पडताळणी केली असता, त्यातून अर्धसत्य समोर आलं. हा स्क्रिनशॉट सप्टेंबर 2021 मधील बातमीचा आहे. त्यावेळी दिल्ली पोलीस ज्या वाहनांची नंबरप्लेट (Number Plate) लिंबू-मिरची लावल्याने झाकून गेली होती, त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत होते. नंबर प्लेट व्यतिरिक्त गाडीत अन्य ठिकाणी लिंबू मिरची लावलेल्या वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. तसेच अशी लिंबू -मिरची लावण्यास मनाई देखील करण्यात आली नव्हती. सेंट्रल मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार प्रत्येक वाहनाच्या नंबर प्लेटवर लिहिलेला रजिस्ट्रेशन क्रमांक स्पष्टपणे दिसणं गरजेचं आहे. दिल्लीत एखाद्या गाडीची नंबरप्लेट स्पष्ट दिसत नसेल तर संबंधित वाहनचालकावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई होऊ शकते. खरंतर या दंडात्मक कारवाईची रक्कम प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. एक जुनी बातमी अपुऱ्या माहितीसह व्हायरल करणं एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे, हे या प्रकारातून लक्षात येतं. (संजय राऊतांच्या ईडी कोठडीवर भावाची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर केला आरोप) या व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये 'पत्रिका' असा उल्लेख आहे. या माहितीच्या आधारे फॅक्ट चेक टीमनं पत्रिका या वेबसाईटवर ही बातमी (News) शोधून काढली. यात 18 सप्टेंबर 2021 ची बातमी सापडली. या बातमीत वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतानाचा फोटो आहे. हा फोटो व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये दिसत आहे. बातमीनुसार, त्यावेळी दिल्ली पोलीस अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करत होते, ज्या वाहनांच्या नंबर प्लेटवर लिंबू-मिरची लावण्यात आली होती. अशा वाहनचालकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. अशा वाहनांच्या नंबरप्लेट वाहतूक पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसत नसल्याने ही कारवाई केली गेली. (JEE Advanced: 7 ऑगस्टपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन; 'ही' कागदपत्रं ठेवा रेडी) दिल्लीचे स्पेशल कमिशनर (वाहतूक) मुक्तेश चंद्र यांनी 'द प्रिंट'ला यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, 'ज्या लोकांच्या वाहनांची नंबरप्लेट कोणत्याही कारणामुळे स्पष्टपणे दिसत नव्हती किंवा ती झाकलेली होती, त्यांच्यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. गाड्यांमध्ये अन्य ठिकाणी लिंबू-मिरची लावल्याने दंडात्मक कारवाई केल्याची कोणीतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. ' मात्र ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही पोस्ट शेअर करताना एका फेसबुक यूजरनं लिहीलं, 'राफेल विमानांवर लिंबू-मिरची लावली जाते तर वाहनांवर का नाही? हे सरकार धर्म विरोधी आहे. 'त्यासोबतच ही पोस्ट शेअर करताना अनेक लोकांनी हा नियम हिंदू विरोधी असल्याचं म्हटलं. पण फॅक्ट चेकमधून पोलीस कारवाईचं कारण पुढे आलं आहे.
First published:

पुढील बातम्या