Home /News /viral /

खरंच कोरोनामुळे घरात बंद असलेले इटलीकर 'दुल्हे का सेहरा' गातायंत? जाणून घ्या व्हायरल VIDEO मागचं सत्य

खरंच कोरोनामुळे घरात बंद असलेले इटलीकर 'दुल्हे का सेहरा' गातायंत? जाणून घ्या व्हायरल VIDEO मागचं सत्य

इटलीमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे Lock-down करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये इटलीच्या काही अपार्टमेंटमधून बॉलिवूड गाणी गातानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

    17 मार्च : चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगामध्ये थैमान घालत आहे. चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी इटलीमध्ये पूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सरकारकडून घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इटलीमध्ये काही अन्नपदार्थांची दुकानं आणि मेडिकल दुकानं वगळता सर्वच बंद आहे. अशावेळी एका अपार्टमेंटमधील लोकांच्या जॅमिंग सेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (हे वाचा- नावात काय आहे? पण 'कोरोना' नाव असण्याचा झाला या दुकानाला फायदा) या व्हिडीओमध्ये इटलीमधील माणसं नुसरत फतेह अली खान यांचं 'दुल्हे का सेहरा' गाताना दिसत आहेत, तर याच दृश्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही लोकं लगान चित्रपटातील 'घनन घनन' गाताना दिसत आहेत. मग अशावेळी प्रश्न पडतो इटलीमध्ये कसं काय हिंदी गाणी गायली जात आहेत. पण या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य मात्र वेगळंच आहे खरतंक या अपार्टमेंटमधील माणसं कदाचित E mentre Siena dorme हे सिएनाचे पारंपारिक लोकगीत गात आहेत. पण भारतातल्या लोकांच्या क्रिकेटीव्हिटीला त्यानंतर तुम्ही नक्की दाद द्याल हा इटलीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी त्यामध्ये इतकं जबरदस्त एडिटिंग केले आहे की, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ते व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'दुल्हे का सेहरा', 'घनन घनन' पासून आझादीच्या घोषणांचं या व्हिडीओमध्ये एडिटिंग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही इंग्रजी गाण्यांचे मेशअप्स सुद्धा व्हायरल झाले आहेत. दरम्यान हे आहेत इटलीमधील लॉकडाऊन दरम्यानचे काही खरे व्हिडीओ- सध्या इटलीमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, अशावेळी नागरिकांकडून परिस्थितीचं गांभीर्य कमी करण्यासाठी यांसारख्या अनेक पर्याय अवलंबले जात आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या