Home /News /viral /

Ghost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण

Ghost Town म्हणून ओळखली जातात जगातील ही भितीदायक शहरं; जाणून घ्या कारण

राजस्थानच्या भानगडमधील भानगडचा किल्ला (Bhangarh Fort Rajasthan) हा भारतातील सर्वाधिक भितीदायक जागांपैकी एक आहे. सूर्य मावळल्यानंतर या किल्ल्यात जाणं अतिशय धोकादायक मानलं जातं.

    जयपूर 21 जून: राजस्थानच्या भानगडमधील भानगडचा किल्ला (Bhangarh Fort Rajasthan) हा भारतातील सर्वाधिर भितीदायक जागांपैकी एक आहे. सूर्य मावळल्यानंतर या किल्ल्यात जाणं अतिशय धोकादायक मानलं जातं. असं म्हटलं जातं, की येथील एका जादूगाराचं स्थानिक राजकुमारीवर प्रेम जडलं होतं. या जादूगारानं राजकुमारीला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी काळ्या जादूची मदत घेतली होती. मात्र, या गोष्टीची भनक राजकुमारीला लागली. यानंतर राजकुमारीनं या जादूगाराला मृत्यूची शिक्षा दिली होती. मरता मरता या जादूगारानं किल्ल्याला शाप दिला होता. तेव्हापासूनच हा किल्ला भितीदायक मानला जातो. एका काळी हाशिमा द्वीप (Hashima Island) जपानमधील प्रमुख ठिकाणांमधील एक समजला जात असे. हे द्वीप नागासाकीच्या जवळ आहे. त्यावेळी याठिकाणी कोळशाची खाण होती. मात्र, अचानक इथलं खोदकाम कमी झालं. एक-एक करून अनेक लोक याठिकाणाहून निघून गेले. स्थानिक लोकांनाही या गोष्टीची माहिती नाही, की याठिकाणी राहाणारे लोक कुठे गेले. आजही याठिकाणी काही जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. भारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार अमेरिकेतील अनेक शहरं Ghost Town या नावानं प्रसिद्ध आहेत. यातच Bodie या शहराचाही समावेश आहे. ही जागा अमेरिकेतील कॅलिफोर्निामधील एक शहर आहे. असं म्हटलं जातं, की साल 1962 च्या आधी हे शहर अत्यंत सुंदर होतं. मात्र, आता हे शहर अगदी सुनसान असतं. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, बिली नामक लुटेऱ्यांमुळे ही जागा आता निर्मनुष्य झाली आहे. महिलेनं केली पतीची हत्या, आरोपीच्या फोनमधील Google हिस्ट्री पाहून पोलीस हैरा इटलीमध्ये क्रॅको (Craco, Italy) नावाचं एक पहाडी गाव आहे. या गावाला भूतांचं शहर असं म्हटलं जातं. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, 1991 मध्ये प्लेग आणि भूसखलनामुळे इथल्या लोकांनी गाव सोडलं होतं.तेव्हापासून या गावाला भूतांचं शहर म्हटलं जातं. हे शहर भितीदायक घटनांसाठी (Horror Incidents) ओळखलं जातं. संध्याकाळ झाल्यानंतर याठिकाणी कोणालाही थांबण्यास परवानगी दिली जात नाही. याठिकाणी फिरण्यासाठीही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Horror, India, Rajsthan, Shocking video viral

    पुढील बातम्या