मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीच्या बहिणीने लग्नातच केली नको ती मस्करी; परिणाम इतका वाईट झाला, की आता मागतीये मदत

नवरीच्या बहिणीने लग्नातच केली नको ती मस्करी; परिणाम इतका वाईट झाला, की आता मागतीये मदत

वधूच्या बहिणीने तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एक विनोदी खेळ खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला. नवरीच्या बहिणीने Reddit वर एक किस्सा सांगितला.

वधूच्या बहिणीने तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एक विनोदी खेळ खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला. नवरीच्या बहिणीने Reddit वर एक किस्सा सांगितला.

वधूच्या बहिणीने तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एक विनोदी खेळ खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला. नवरीच्या बहिणीने Reddit वर एक किस्सा सांगितला.

नवी दिल्ली 31 मे : तुमच्या लग्नाच्या दिवशीच (Wedding Day) कोणी तुमच्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काय होईल? कोणीतरी या चांगल्या दिवसाची पूर्णपणे वाट लावली, असंच कोणाच्याही मनात येईल. असंच काहीसं एका वधूसोबत घडलं, जिच्या बहिणीने तिच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस खराब केला. यानंतर आता वधूच्या या बहिणीनेच सोशल मीडियावर (Social Media) आपली व्यथा सांगितली, त्यानंतर काही लोक तिची मस्करी करत आहेत तर काहीजण तिच्या बहिणीचं कृत्य चुकीचं असल्याचं म्हणत आहेत.

वधूच्या बहिणीने तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एक विनोदी खेळ खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला. नवरीच्या बहिणीने Reddit वर एक किस्सा सांगितला. यात तिने म्हटलं की 'माझ्या बहिणीचा जवळपास 2 वर्षांपूर्वी साखरपुडा झाल होता'. तिने Reddit च्या Am I The Asshole वर याबाबत लिहिलं आहे. तिने या घटनेबाबत लोकांकडे समर्थन मागितलं आणि म्हटलं की मी फक्त मस्करी करत होते..

OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स

द सनच्या रिपोर्टनुसार, नवरीच्या बहिणीने सांगितलं की मला तिचा राग येत नाही. वयातील अंतरामुळे आम्ही कधीच बहिणींप्रमाणे एकमेकींच्या खूप जवळ नव्हतो, पण आम्ही एकमेकींचा रागरागही करत नव्हतो. तिचा पती एक महान व्यक्ती आहे. मी खरंतर त्या दोघांसाठी खूप खूश आहे. ती म्हणाली, लग्नानंतर कार्यक्रम समाप्त होताना पादरींनी विचारलं की या लग्नाविषायी कोणाला काही आपत्ती आहे का? आणि मी उभा राहून म्हटलं की 'हो मला तक्रार आहे...कारण हे कपल एकमेकांवर खूप प्रेम करतं.'

नवरीच्या बहिणीने सांगितलं की मी हे फक्त मस्करी म्हणून बोलले. मला असं वाटलं की हे ऐकून रिसेप्शनमधील सर्व लोक हसू लागतील. मात्र मी उभा राहताच माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला. पुढे तिने लिहिलं, 'माझी बहीण कदाचित माझ्यावर अजूनही नाराज आहे. कार्यक्रमात तेवढं बोलून मी खाली बसले आणि कार्यक्रम पुढे सुरू राहिला. रिसेप्शनमध्ये मी माझ्या बहिणीच्या जवळ गेले, मात्र ती खूप नाराज होती. तिने मला म्हटलं की तुझी मस्करी ही खरंतर मस्करी नव्हती. तू माझा मूड, माझा आनंद आणि माझा दिवस पूर्णपणे खराब केलास. हे ऐकून मला धक्का बसला'

अजब प्रेमाची गजब कहाणी! चक्क प्लेनसोबत रिलेशनशिप; विमानाशीच लग्नही करतेय ही तरुणी

महिलेला या पोस्टनंतर लोक आपल्याला समर्थन देतील अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांनी तिलाच सुनावलं आहे. एका यूजरने लिहिलं, 'तिच्या इतक्या खास दिवशी, अशा पद्धतीने सीन क्रिएट करणं चुकीचं होतं.' दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'कदाचित तू आणि तुझ्या बहिणी अशा मस्करीचं बॉन्डिंग नसेल.' आणखी एकाने लिहिलं, 'काही लोक तर अशा गोष्टीनंतर लग्नाचा कार्यक्रमही मध्येच थांबवतात. तू खरंच संपूर्ण लग्न खराब केलं होतं.'

First published:

Tags: Viral news, Wedding couple