नवी दिल्ली, 19 मार्च : साप हा खूप विषारी प्राणी असून त्याचं नाव घेतलं तरी अनेकजणांची घाबरगुंडी होते. सापाच्या विषारी दंशाने क्वचितच माणूस वाचतो. त्यामुळे सापाविषयी अनेकांच्या मनात खूप भिती असते. काही साप हे अतिशय धोकादायक आणि विषारी असतात, तर अनेक सापांमध्ये विष आढळत नाही. तरीही लोक सापांना घाबरतात आणि कधीकधी ते इतके घाबरतात की ते त्यांना पाहून पळून जातात. मात्र यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क सापच नाटक करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती सापाला सरळ जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो साप वारंवार उलटतो आणि मेल्यासारखे नाटक करतो. त्या व्यक्तीने अनेक वेळा सापाला सरळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो उलटा होताना दिसून आला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती त्याला किती त्रास देत असली तरी तो वळुनही त्याला चावत नाही, तर मेल्याचे नाटक करताना दिसतो.
Snake trying WAY too hard to play dead pic.twitter.com/hPmZsMPxyB
— Creepy (@creepy_org) March 17, 2023
हा मजेदार व्हिडिओ @creepy_org नावाच्या आयडीने ट्विटरवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 81 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे.
दरम्यान, लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी गंमतीने म्हणत आहे की सापाला शाळेत जायचे नाही, म्हणूनच तो अभिनय करत आहे, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Videos viral, Viral