इंटरनॅशनल क्रिकेटरांनाही या हत्तीची दहशत; VIDEO मध्ये पाहा गन्नुप्रेमचा सॉलिड गेम!

इंटरनॅशनल क्रिकेटरांनाही या हत्तीची दहशत; VIDEO मध्ये पाहा गन्नुप्रेमचा सॉलिड गेम!

सध्या एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे क्रिकेट (Cricket) खेळणाऱ्या हत्तीचा.

  • Share this:

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही गंभीर असतात तर काही मजेशीर असतात. हे व्हिडिओ कधी डोळ्यात पाणी आणतात तर कधी ओठावर हसू. अनेक प्रकारची माहितीही याद्वारे मिळत असते. सध्या एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे क्रिकेट (Cricket) खेळणाऱ्या हत्तीचा (Elephant Playing Cricket). गन्नु (Gannu)असं या हत्तीचं नाव आहे.

इंडियाटुडे डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार, एका गावात एक हत्ती आणि काही माणसे क्रिकेट खेळत असल्याचा हा व्हिडिओ आहे. अवघ्या तीस सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप ट्विटरवरील (Twitter) गन्नुप्रेम (Gannuprem) नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘तुम्ही कधी हत्तीला क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का?आंतरराष्ट्रीय खेळाडूपेक्षाही हा हत्ती चांगलं क्रिकेट खेळतो.’ अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. सहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी ही व्हिडिओ क्लिप बघितली असून,त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. काही लोकांनी याचा आनंद घेतला आहे तर काही लोकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

यामध्ये एक हत्ती त्याच्या सोंडेत (Trunk) एक काठी (Stick) धरून काही लोकांसोबत क्रिकेट खेळत असल्याचं दिसत आहे. इथं जमलेल्या माणसांच्या गटातील एखादा माणूस हत्तीकडे बॉल फेकत आहे आणि तो हत्ती सोंडेतल्या काठीने त्या बॉलला फटकावत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ अतिशय वेगानं व्हायरल झाला असून,अनेकांनी या हत्तीचं कौतुक केलं आहे. क्युट अशी प्रतिक्रिया अनेक नेटीझन्सनी दिली आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी हत्तीला असं खेळवण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

‘हत्ती नैसर्गिक रीत्या असे स्टंटस करत नाहीत. हे आनंददायी नाही तर वाईट आहे,अशी प्रतिक्रिया एका नेटीझननं व्यक्त केली आहे. ‘लोकांना कळत नाही प्राणी अशा मनोरंजन करण्याच्या कामात येण्यासाठी किती त्रास सहन करतात. एखादी गोष्ट त्यांना येईपर्यंत शिक्षा दिली जाते. माणसांना प्राण्यांचे असे खेळ दाखवून पैसे कमावता यावेत यासाठी प्राण्यांना शिक्षा दिली जाते. त्यांचा छळ केला जातो,अशी तीव्र नाराजी एका प्राणीप्रेमी नेटीझननं व्यक्त केली आहे. एकानं असं म्हटलं आहे की,हत्तीच्या सोंडेत(Trunk)तब्बल 40 हजार स्नायू असतात. तर माणसाच्या संपूर्ण शरीरात 600पेक्षा जास्त स्नायू असतात. यावरून विचार करा एखादी कृती अचूक करायला हत्तीला किती स्नायूंवर नियंत्रण ठेवावे लागत असेल. तर काहींनी या हत्तीचं खूप कौतुक केलं आहे.

First published: May 10, 2021, 11:30 PM IST

ताज्या बातम्या