मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर अंपायरने दिले Out, पाहा मजेशीर VIDEO

बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर अंपायरने दिले Out, पाहा मजेशीर VIDEO

क्रिकेटच्या मैदानात घडलेला एखादा प्रसंग कित्येकदा मॅचच्या रिझल्टपेक्षा जास्त लक्षात राहतो. 'या' मॅचमध्ये अंपायरची (Umpire) कृती लक्षवेधी ठरली असून ती सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 मे: क्रिकेटच्या मैदानात घडलेला एखादा प्रसंग कित्येकदा मॅचच्या रिझल्टपेक्षा जास्त लक्षात राहतो. दोन खेळाडूंमधील विनोद, मैदानातील फॅन्स आणि क्रिकेटपटूंमधील संवाद, प्रेक्षकांचे लक्षवेधी पोस्टर हे मॅच संपल्यानंतरही चर्चेचा विषय असतात. नुकत्याच घडलेल्या एका मजेशीर प्रसंगात चक्क अंपायरचा (Umpire) सहभाग होता.

मॅचच्या दरम्यान मैदानातील अंपायरवर मोठी जबाबदारी असते. त्यांचा एक निर्णय मॅचचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे अंपायरिंग करत असताना कोणती चूक घडू नये म्हणून ते सतत प्रयत्न करत असतात. त्यामध्येही एखादा अंपायर त्याच्या लक्षवेधी कृतीने सर्वांच्या चर्चेचा विषय बनतो. युरोपीयन क्रिकेट सीरिजमध्ये (European cricket series) देखील असाच एक प्रकार घडला आहे. या अंपायरची कृती सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाली आहे.

काय घडला प्रसंग?

युरोपियन क्रिकेट सीरिजमधील आचेन रायझिंग स्टार विरुद्ध वीएफबी गेल्सनकर्चेन यांच्यातील लढतीमध्ये हा मजेशीर प्रसंग घडला. या मॅचमध्ये गेल्सकर्चेनच्या बॅट्समनला आऊट करण्यासाठी अंपायरने इतका वेळ घेतला की त्यामध्ये बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि तो निराश झाला होता.

WTC Final : टीम इंडियाला 'या' गोष्टीचा मोठा फायदा, न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची कबुली

गेल्सनकर्चच्या इनिंगमधील दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी बॉलरने बराचवेळ अपिल केले, तरीही अंपायरने आऊट दिले नाही. त्यामुळे बॉलर निराश होऊन परत बॉलिंगसाठी निघाला होता, त्यावेळी अंपायरचा निर्णय झाला आणि त्यांनी आऊटचा निर्णय देण्यासाठी बोट वर केले. हा मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Cricket, Viral video on social media, Viral video.