Home /News /viral /

क..मा..ल! इंजिनीअर्सनी 85 वर्षे जुनी इमारत न तोडता केली शिफ्ट; विश्वास नसेल तर पाहा VIDEO

क..मा..ल! इंजिनीअर्सनी 85 वर्षे जुनी इमारत न तोडता केली शिफ्ट; विश्वास नसेल तर पाहा VIDEO

तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे शक्य आहे

    बीजिंग, 25 ऑक्टोबर : चीनच्या इंजिनीअरनी कमाल केली आहे. 7600 टनच्या एका बिल्डिंगला (Building) न तोडला एका जाग्यावरुन दुसऱ्या जागेवर शिफ्ट (Shift) करण्यात आलं. ही इमारत शांघाई शहरातील एका शाळेची आहे. ही इमारत 1935 मध्ये तयार करण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेत चीनच्या इंजिनीअरनी अनोख्या पद्धतीचा वापर केला आणि जगात एक नवीन आदर्श तयार केला आहे. स्थानिक प्रशासनानुसार या शाळेच्या जागेवर एक नव्या भवनाची उभारणी होणार आहे. ऐतिहासीक इमारत असल्याने इंजिनीअरांनी इमारत तोडून पाडण्याऐवजी याला शिफ्ट करण्याचा विचार केला व यात ते यशस्वी झाले. चिनी सरकारी मीडियानुसार इंजिनीअरांनी यासाठी 198 रोबोटिक टूलचा वापर केला आणि हजारो टन वजनाची ही इमारत सरकवत तब्बल 62मीटर लांब उभी केली. चिनी मीडिया सीसीटीव्ही न्यूज नेटवर्कनुसार या कामासाठी 18 दिवसांचा अवधी लागला. 15 ऑक्टोबर रोजी याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. हे ही वाचा-दहनापूर्वीच रावण बेपत्ता, शोधाशोध करून नागरिक हैराण...पोलीसही निरुत्तर आतापर्यंत इमारतींना मोठ्या प्लॅटफॉर्मवर जास्त क्षमता असलेल्या क्रेनने खेचलं जात होते, मात्र या कामामुळे रोबोटिक लेग्जचा वापर करण्यात आला. ही एक मोठी गोष्ट आहे. यापूर्वी 2017 मध्ये 135 वर्षांपूर्वी तयार केलेल्या आणि तब्बल 2 हजार टनच्या ऐतिहासिक बौद्ध मंदिरही 30 मीटरपर्यंत सरकवण्यात आलं होतं. यासाठी 15 दिवसांचा अवधी लागला होता.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या