Jugaad Engineers चे आनंद महिंद्राही झाले फॅन; तुम्हीदेखील VIDEO एकदा पाहाच

Jugaad Engineers चे आनंद महिंद्राही झाले फॅन; तुम्हीदेखील VIDEO एकदा पाहाच

आज Engineers Day च्या निमित्ताने भारतातील या देशी जुगाडला दाद तर द्यायलायच हवी.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : भारतातील पहिले अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (mokshagundam visvesvaraya) यांच्या स्मरणार्थ 15 सप्टेंबर हा दिवस भारतात अभियंता दिवस (Engineers Day) म्हणून साजरा केला जातो.  देशातील सर्वात नामवंत असे अभियंता, धरणांचे निर्माता, राजकारणी अर्थतज्ज्ञांपैकी ते एक होते. म्हैसूरमधील राजा सागर धरणाचे बांधकाम आणि पूर संरक्षण यंत्रणा यासाठी त्यांना 1955 मध्ये भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच राजा जॉर्ज यांनीदेखील त्यांना ब्रिटीश नाईटहूड सन्मान जाहीर केला होता.

अभियांत्रिकी म्हणजे खूपच कठीण आहे, असं मानलं जातं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं जातं. मात्र अनेकांनी अभियांत्रिकीचं शिक्षण न घेता बुद्धिमता आणि कौशल्याच्या आधारे कुणालाही विश्वास बसणार नाही, असे देशी जुगाड शोधून काढले आहेत. असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. Engineers Day च्या निमित्ताने उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या अशाच काही देशी जुगाडचे व्हिडीओ पाहुयात.

मक्याचे दाणे वेगळे करण्यासाठी दुचाकीचा वापर

दुचाकीचा वापर करून मक्याच्या कणसांपासून मक्याची दाणे वेगळी केली जातात असं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. शेतकऱ्यांच्या कल्पकदृष्टीचे हे उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दारूच्या दुकानात सोशल डिस्टन्सिंग

एका व्हिडिओत एका दारूच्या दुकानातील वितरण व्यवस्था दाखवण्यात आली आहे. यात दुकानाच्या खिडकीतून एक लांब पाईप बाहेर टाकण्यात आला आहे. ज्याद्वारे ग्राहकांना एक प्लॅस्टिकची कापलेली बाटली सोडली जाते त्यात पैसे ठेवल्यानंतर ही बाटली परत ओढली जाते आणि त्यानुसार मग दारूची बाटली पाठविली जाते.

दरवाजा बंद करणारी बाटली

या व्हिडिओत एक दरवाजा बंद करण्यासाठी एका पाण्याने भरलेल्या बाटलीचा वापर करण्यात आला आहे. ही बाटली दरवाजावर टांगण्यात आली आहे. दरवाजा उघडल्यानंतर बाटलीच्या वजनाने तो आपोआप बंद होतो़.

प्लॅस्टिक टाक्यांचा असाही वापर

उद्योगपतींनी गॅरेजच्या घरातील दुचाकी वाहनांमध्ये प्लॅस्टिकची टाकी बनवल्याच्या प्रतिमा शेअर केल्या आहेत आणि असं म्हटलं की लोकांच्या कल्पकतेचा आणि वस्तू पुनर्वापराचे हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे

Published by: Priya Lad
First published: September 15, 2020, 5:53 PM IST

ताज्या बातम्या