मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'ओवेसी नकूल तर मोहन भागवत शकुनी मामा होते'; सुट्टीसाठी इंजिनिअरचं अजब महाभारत, मिळालं भन्नाट उत्तर

'ओवेसी नकूल तर मोहन भागवत शकुनी मामा होते'; सुट्टीसाठी इंजिनिअरचं अजब महाभारत, मिळालं भन्नाट उत्तर

अभियंत्याने लिहिले की त्याला त्याच्या मागील जन्मातील गोष्टी आठवल्या आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे त्याचे मागील जन्मातील मित्र नकुल होते तर आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) शकुनी मामा होते.

  • Published by:  Kiran Pharate

भोपाळ 10 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आगर मालवा जिल्ह्यातील मनरेगामध्ये तैनात असलेल्या एका अभियंत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला रविवारच्या सुट्टीसाठी एक विचित्र पत्र (Weird Letter) लिहिले आहे. जिल्हा पंचायत सुस्नेरच्या या अभियंत्याने लिहिले की त्याला त्याच्या मागील जन्मातील गोष्टी आठवल्या आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे त्यांचे मागील जन्मातील मित्र नकुल होते तर आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) शकुनी मामा होते. अभियंत्यानं हे पत्र जिल्हा पंचायतीच्या अधिकृत गटात टाकले आहे.

सुंदर न दिसण्यासाठी ही तरुणी करते भलताच खटाटोप; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही या अभियंत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. त्यांनी अभियंत्याला रविवारी कार्यालयात काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी लिहिलं आहे, की रविवारी काम केल्याने तुमचा हा मागच्या जन्माबाबतचा अहंकार संपेल. सोशल मीडिया ग्रुपची (Social Media Group) ही चॅटिंग (Chatting Viral) आता समोर आली आहे.

सुस्नेर जिल्ह्यात तैनात उपअभियंता राजकुमार यादव यांनी लिहिलं - रविवारी ते जिल्ह्याच्या कोणत्याही कामाला उपस्थित राहू शकणार नाही, कारण आत्मा अमर आहे हे त्याला काही दिवसांपूर्वी समजले आहे. सोबतच मागील जन्मातील गोष्टीही त्यांना आठवल्या आहेत. खासदार असदुद्दीन ओवेसी हे माझे मागील जन्मातील मित्र नकुल आणि मोहन भागवत शकुनी मामा होते, त्यामुळे मला माझे जीवन जाणून घेण्यासाठी गीता वाचायची आहे, असं या व्यक्तीनं म्हटलं होतं. हा त्यांच्या आत्म्याचा सवाल असल्यानं घरोघरी जाऊन भीक मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि रविवारी सुट्टी मागितली.

मुलाच्या एका चुकीमुळे बाप झाला कोट्यवधी; कुटुंबाला बसला आश्चर्याचा धक्का!

पत्र वाचल्यानंतर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग पंथी यांनीही अभियंत्याच्या भाषेत उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं - 'प्रिय उप अभियंता, तुम्हाला तुमचा अहंकार मिटवायचा आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. यामध्ये आमचे अतूट सहकार्यदेखील मिळू शकते. हा विचारच मनात आनंद निर्माण करतो. एखादी व्यक्ती अहंकारी होते आणि त्याला वाटते की तो आपला रविवार आपल्या इच्छेनुसार घालवू शकतो. हा अहंकार नष्ट करणे आपल्या प्रगतीसाठी अपरिहार्य आहे. म्हणून, तुमची आध्यात्मिक प्रगतीची इच्छा लक्षात घेऊन, तुम्हाला दर रविवारी कार्यालयात उपस्थित राहून काम करण्याचे आदेश दिले जात आहेत. जेणेकरून रविवार सुट्टी म्हणून साजरा करण्याचा तुमचा अहंकार नष्ट होईल.

First published:

Tags: Viral news, Viral photo