मुंबई, 01 डिसेंबर : कोणत्याही इंटरनल कंबशन इंजिनवर (ICE) चालणाऱ्या वाहनाचं आयुष्य त्याच्या इंजिनवर अवलंबून असतं. त्यामुळे या इंजिनची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्व्हिसिंग आणि इंजिन ऑईल वेळोवेळी बदलणं आवश्यक आहे. इंजिनसाठी बाजारात प्रामुख्यानं दोन प्रकारची ऑईल मिळतात. एक सिंथेटिक ऑईल आणि दुसरे पारंपरिक ऑईल.
पण आजकाल अनेक कार उत्पादक इंजिनमध्ये सिंथेटिक ऑईल टाका, अशी शिफारस करतात. सिंथेटिक ऑईल हे केमिकल कंपाउंड्सने बनलेलं वंगण (ल्युब्रिकंट ) आहे, जे कृत्रिमरित्या तयार केलं गेलं आहे. हे ल्युब्रिकंट खनिज किंवा पारंपरिक ऑईल कमतरता दूर करण्यासाठी तयार केलं जातं.
सिंथेटिक ऑईलचे फायदे पॉवरचा कमी वापर
केमिकल कंपाउंड्स वापरून सिंथेटिक ऑईल तयार केलं जातं. हे सिंथेटिक कंपाउंड्स पेट्रोलियम मॉलिक्युलपासून बनवले जातात. हे मशीनला नियमित ल्युब्रिकेशन देत असतं, ज्यामुळे कमी पॉवर वापरली जाते, आणि कार्यक्षमतादेखील वाढते. तसंच, सिंथेटिक ऑईलचा ज्या इंजिनमध्ये वापर केला जातो, त्या इंजिनला जड भार ट्रान्सफर करण्यासाठी कमी शक्ती किंवा हॉर्स-पॉवर (एचपी) आवश्यक असते.
हे ही वाचा : आपल्या जीवाची पर्वा न करता कॉन्स्टेबलने पकडला चोर, Video पाहून नेटकरी करतायत कौतुक
कमी देखभाल खर्च
नैसर्गिक उत्पादनांच्या तुलनेत सिंथेटिक उत्पादनांमध्ये कमी अशुद्धता असते, ज्यामुळे मशीनचा देखभाल खर्च कमी होतो. रचनेच्या दृष्टीने हे अधिक शुद्ध उत्पादन आहे, त्यामुळे कमी आणि जास्त तापमान, पाणी, दूषित इंधन, अॅसिड्स आणि मशीन इंजिनमधील इतर ज्वलन बाय प्रॉडक्ट्सच्या संपर्कात आल्यानंतरही सिंथेटिक ल्युब्रिकंट्स स्थिर राहतात.
सिंथेटिक ऑईल आणि ल्युब्रिकंट्स वापरून चालवल्या जाणार्या वाहनांना किंवा मशीनला वारंवार सर्व्हिसिंगची आवश्यकता नसते. उलट, अशा वाहनांना पारंपरिक आणि मिनरल ऑईलपेक्षा कमी वेळा ऑईल बदलावं लागतं. सुमारे 8046-11265 किलोमीटर नंतर ऑईल बदलण्याची गरज पडते.
उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही ऋतुंमध्ये उपयोगी
सिंथेटिक ऑईलवर तापमानाचा फारसा परिणाम होत नाही. सिंथेटिक ऑईल कमी तापमानात इंजिनमध्ये गोठत नाही, तसंच जास्त तापमानात पातळ होत नाहीत. सिंथेटिक ऑईलचा फ्लॅश पॉइंट जास्त असतो. याचा अर्थ ते लवकर पेट घेत नाही.
हे ही वाचा : मगरीचा सापावर हल्ला, या लढाईत कोण जिंकेल सांगा? पाहा Viral Video
गाडी खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. पण गाडीचं इंजिन ऑईल बदलताना मात्र कमी खर्चात हे काम कसे होईल, याचा विचारही अनेकजण करतात. परंतु गाडी व्यवस्थित राहावी, यासाठी त्यामध्ये चांगलं इंजिन ऑईल टाकणं गरजेचं आहे. अशावेळी सिंथेटिक ऑईलला प्राधान्य देणं फायद्याचं ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news