Home /News /viral /

सात वर्षांत पहिल्यांदाच ऑफिसला पोहोचायला 20 मिनिटं झाला उशीर; कर्मचाऱ्याची गेली नोकरी

सात वर्षांत पहिल्यांदाच ऑफिसला पोहोचायला 20 मिनिटं झाला उशीर; कर्मचाऱ्याची गेली नोकरी

एका व्यक्तीला सात वर्षांत पहिल्यांदा ऑफिसात पोहोचण्यासाठी 20 मिनिटं उशीर झाला म्हणून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

मुंबई, 05 ऑगस्ट:  अनेक कर्मचारी ठरवूनही वेळेत ऑफिसमध्ये पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे दररोज उशीर होण्याची नवनवीन कारणं सांगत असतात. यावरून बॉस त्यांना अनेकदा रागावतो, तंबीही देतो. परंतु, एका व्यक्तीला सात वर्षांत पहिल्यांदा ऑफिसात पोहोचण्यासाठी 20 मिनिटं उशीर झाला म्हणून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्याने रेडिटवर (Reddit) ही घटना मांडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया साईट रेडिट अँटीवर्क थ्रेडवर एका युजरने पोस्ट लिहिली आहे. यात त्याने बडतर्फ कर्मचाऱ्यासोबत जे काही घडलं त्याबद्दल भावना मांडल्या आहेत. यात म्हटलं आहे की, सहकारी सात वर्षांपासून कंपनीत काम करतो. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला ऑफिसात पोहोचायला 20 मिनिटं उशीर झाला. हेच कारण देत कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. घटना नेमकी कुठली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण सहकाऱ्याला नोकरीवर परत घेईपर्यंत आपणही ऑफिसला उशिरा यायचं असा निर्णय त्या ऑफिसातल्या इतर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. ‘उद्या मी व माझे सर्व सहकारी कामावर उशिरा येणार आहोत. आमच्या सहकाऱ्याला पुन्हा नोकरीवर नियुक्त करेपर्यंत आम्ही असंच करत राहू,’ अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट अन्याय घडलेल्या व्यक्तीच्या सहकाऱ्याने लिहिली आहे. हेही वाचा - Walk Benefit : जेवणानंतर अवघ्या 2 मिनिटांचा वॉकही ठरू शकतो आरोग्यदायी; वाचा चालण्याचे फायदे पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया, कंपनीचाही निषेध एक सहकारी सात वर्षांत कधी उशिरा आला नाही त्याला पहिल्यांदा उशिरा आल्याने नोकरीवरून काढून टाकण्यात आलं, असा मथळा देऊन पूर्ण घटना रेडिटवर शेअर करण्यात आली. यानंतर पोस्टला 78,000 लोकांनी पसंती दाखवली. अनेक युजर्सनी यावर आपलं मतही मांडलं. काही जणांनी तर कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेणाऱ्या कंपनीचा निषेध नोंदवला. एका युजरने तर नोकरीवरून काढलेल्या सहकाऱ्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल, त्याची अवस्था वाईट असेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे, एका युजरने कंपनीच्या धोरणावर प्रश्न निर्माण केले आहेत. कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची कारणं शोधली जात आहेत. कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाच नोकरीवर ठेवलं जात आहे असंही त्याने म्हटलंय. कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी कंपन्या अनेक कारणं शोधत असतात. यात अनेकांना काम चांगलं नसल्याने तर काहींना ‘कॉस्ट-कटिंग’च्या नावाखाली बडतर्फ करण्यात येतं. काही कंपन्या तर कडक शिस्तीसाठी ओळखल्या जातात. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी ऑफिसात उशिरा आल्यास त्यांचा पगार कापला जातो. पण फक्त 20 मिनिटं उशिरा आल्याने सात वर्षं जुन्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं जात असेल तर तो त्याच्यावर अन्याय आहे, अशी भावना नोकरीवरून काढलेल्या त्या कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
First published:

Tags: Viral, Viral news

पुढील बातम्या