मराठी बातम्या /बातम्या /Viral /फेसबुक पोस्टची कमाल! 46 वर्षांनी महिलेला परत मिळालं हरवलेलं पाकीट

फेसबुक पोस्टची कमाल! 46 वर्षांनी महिलेला परत मिळालं हरवलेलं पाकीट

एका कर्मचाऱ्याला 46 वर्षांपूर्वी हरवलेलं एक पाकीट सापडलं (Employee Found a Wallet In Theatre) . टॉम स्टेवन्स नावाच्या व्यक्तीला सापडलेल्या या पाकीटाचा मालक शोधण्यासाठी त्यानं हे पाकीट उघडून पाहिलं.

कॅलिफोर्निया 07 जून : चित्रपगृहाचं (Iconic Ventura Theatre) दुरुस्तीचं काम सुरु असताना एका कर्मचाऱ्याला 46 वर्षांपूर्वी हरवलेलं एक पाकीट सापडलं (Employee Found a Wallet In Theatre) . टॉम स्टेवन्स नावाच्या व्यक्तीला सापडलेल्या या पाकीटाचा मालक शोधण्यासाठी त्यानं हे पाकीट उघडून पाहिलं. यावेळी त्याला पाकीटात एक ड्रायविंग लायसन्स सापडलं, जे 1976 मध्ये एक्सपायर झालं होतं. इतकंच नाही तर त्याला 1973 मधील एका कॉन्सर्टचं तिकीटही यात आढळलं. आपल्या मालकाच्या सल्ल्यानंतर त्यानं थिएटरच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती शेअर केली. ही घटना कॅलिफोर्नियामधील आहे.

हे पाकीट कॉलिन डिस्टीन नावाच्या महिलेचं होतं. या कर्मचाऱ्यानं फेसबुकवर पाकीटाचा फोटो शेअर केला आणि या महिलेला कोणी ओळखत असेल किंवा तिच्यासोबत काही संपर्क असेल आणि हे पाकीट तिला परत करू शकत असाल, अशा लोकांनी संपर्क करा, असं लिहिलं. 26 मे रोजी करण्यात आलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि अखेर या शोधाला यश मिळालं. डिस्टीननं या थिएटरसोबत संपर्क साधला आणि 1975 मध्ये एक चित्रपट पाहात असताना तिचं हे पाकीट हरवल्याचं तिनं सांगितलं.

बाहेर लोकांना उपदेश, घरी पत्नीला मारहाण; बुवाच्या राक्षसी अवताराचा VIDEO VIRAL

तिनं सांगितलं, की मला आजही आठवतंय, की दुसऱ्या दिवशी मला समजलं की माझं पाकीट हरवलं आहे. मी विचारणा केली असता, त्यांनी सांगितलं की माझं पाकीट कोणालाही सापडलं नाही. त्यात थोडे पैसेही होती. मात्र, तेव्हा मला त्या पैशांची गरज होती. यात कोणाचे फोटो आहेत आणि कुठलं कॉन्सर्ट तिकीट आहे, याबाबत मला आता काही आठवत नाही. या महिलेनं थिएटरनं पाकीटाच्या मालकापर्यंत ते पोहोचवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचंही कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Social media viral, Viral news