नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : आईच्या(Mother) प्रेमाला जगात कुठंही तोड नाही. आपलं मूल सदैव सुरक्षित आणि निरोगी राहावं यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते. मुलगा कितीही मोठा झाला तरीदेखील आईसाठी तो लहानच असतो. अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. ब्रिटनमधील एका डॉक्टर मुलानं याबद्दलचं ट्वीट केलं आहे. अमीर खान या डॉक्टरनं आपल्या आईनं आपल्यासाठी पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्वीट केल्यानंतर हा फोटो व्हायरल (Photo Viral) झाला असून यामध्ये आईला आपल्या मुलाची किती काळजी आहे हे दिसून येत आहे.
ब्रिटनमधील डॉक्टर अमीर खान रूग्णालयात ऑपरेशनमध्ये व्यस्त असताना त्याच्या आईनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा संपर्क न झाल्यानं तिनं दवाखान्यातील रिसेप्शनमध्ये त्याच्यासाठी मेसेज केला. यामध्ये बाहेर बर्फ(Snow) पडत असून हॉस्पिटलमधून निघताना कोट(Coat) घालून निघ असा मेसेज होता. त्यानं हा मेसेज 9 फेब्रुवारीला शेअर केला असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. हे ट्वीट खूप व्हायरल झालं असून 72 हजार लाईक्स त्याला मिळाले आहेत. 'बेटा स्वेटर पहन लो' या पद्धतीचं वाक्य अनेकांना ऐकायला मिळत असतं. याच पद्धतीचं त्याचं ट्वीट असून अनेकांना कधीतरी आपल्या आईकडून हे वाक्य ऐकायला मिळालं असेलच.
I missed several calls from #MamaKhan as I’ve been busy in surgery
Then received this message from reception: pic.twitter.com/mWNzuKTP0m — Dr Amir Khan GP 💙 (@DrAmirKhanGP) February 9, 2021
उना कल्किन नावाच्या एका युजरने आयरिश मातांकडून देखील असाच सल्ला मिळत असल्याचं म्हटलं आहे. यावर अमीर खान या डॉक्टरनं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या सर्व माता सारख्याच असल्याचं पाहून आनंद होत असल्याचं म्हटलं आहे. ज्युलिया ब्रॅडबरी नावाच्या दुसर्या युजरनं म्हटलं, की तिची ग्रीक आईसुद्धा त्याच्या आईसारखी आहे. यावर अमीर यांनी उत्तर देताना आशियाई आणि ग्रीक मॉम्स अगदी सारख्याच असल्याचं म्हटलं आहे. आईच्या ममतेवर आणि काळजावर भाष्य करताना स्वतः एक आई असलेल्या कॅथी हडसन यांनी आपला मुलगा 18 वर्षांचा झाला असल्याचं म्हटलं आहे. माझ्यापेक्षा तो जास्त उंच झाला असला तरीदेखील आजही रस्ता ओलांडताना आपण त्याचा हात पकडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ट्रेसी नावाच्या आणखी एक युजरने आपल्या कौटुंबिक ग्रुपवर हा मेसेज पोस्ट करत आपल्या मुलांना गाडी चालवताना काळजी घेण्यास सांगितलं. भलेही मुलं वेगळी राहात असली आणि त्यामधील एखादा स्वत: पालक झाला असला तरीदेखील मुलं नेहमी मुलंच असल्याचं तिनं म्हटलं आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये (NHS) डॉक्टर म्हणून काम करण्याबरोबरच अमीर हे लेखक आणि स्तंभलेखक देखील आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Emotional