मराठी बातम्या /बातम्या /Viral /''त्या फोनमध्ये माझ्या आईच्या आठवणी आहेत...मला तो फोन परत आणून द्या''

''त्या फोनमध्ये माझ्या आईच्या आठवणी आहेत...मला तो फोन परत आणून द्या''

सोशल मीडियावर सध्या एका 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र व्हायरल होतं आहे. कर्नाटकच्या कोडागूमध्ये राहणाऱ्या या मुलीनं पोलिसांना हे पत्र लिहिलं आहे.

सोशल मीडियावर सध्या एका 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र व्हायरल होतं आहे. कर्नाटकच्या कोडागूमध्ये राहणाऱ्या या मुलीनं पोलिसांना हे पत्र लिहिलं आहे.

सोशल मीडियावर सध्या एका 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र व्हायरल होतं आहे. कर्नाटकच्या कोडागूमध्ये राहणाऱ्या या मुलीनं पोलिसांना हे पत्र लिहिलं आहे.

कर्नाटक, 23 मे: सोशल मीडियावर सध्या एका 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र व्हायरल होतं आहे. कर्नाटकच्या कोडागूमध्ये राहणाऱ्या या मुलीनं पोलिसांना हे पत्र (Emotional Letter)लिहिलं आहे. या मुलीनं पत्रात आपल्या आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची कळकळीची विनंती केली आहे. पोलिसांनीही देखील मुलीच्या पत्राची दखल घेतली आहे.

नेमकी घटना काय?

ही मुलगी सध्या अनाथालयात राहते. 16 मे रोजी मुलीच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं. हृतिकक्षा असं या मुलीचं नाव आहे. हृतिकक्षा ही कोडागुच्या (Karnataka Kodagu) कुशनगरची रहिवासी आहे. तिनं स्थानिक उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड रुग्णालयाला हे पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा- ...म्हणून पुण्यातले व्यापारी अस्वस्थ, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' विनंती

हृतिकक्षानं पत्रात काय लिहिलं

माझ्या आई आणि वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर माझ्या आईची तब्येत बिघडली आणि तिला माडिकेरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मी आणि माझे वडील घरी होतो. त्यावेळी आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही.

माझे वडील रोजंदारी करतात. शेजारच्यांनी मदत केल्यामुळे आज आम्ही हा दिवस पाहू शकत आहोत. 16 मे रोजी माझ्या आईचं निधन झालं. माझ्या आईचा फोन तिच्यासोबत होता. ज्यावेळी तिच्याबरोबर जे होतं त्यांनी तिचा फोन घेतला आहे. आई गेल्यानं मी अनाथ झाले आहे. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्यामुळे मी विनंती करते की, ज्यांनी माझ्या आईचा फोन घेतला आहे किंवा ज्यांना सापडला असेल त्यांना तो अनाथलयात परत आणून द्या.

इंडियन एक्स्प्रेसनं हृतिकक्षाचे वडील नवीन कुमार यांच्याशी बातचीत केली. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, माझी पत्नी टी के प्रभाचे १६ मे रोजी कोरोनाने निधन झाले. तिचे इतर सामान आमच्याकडे देण्यात आले. मात्र तिचा मोबाईल त्यात नव्हता. आम्ही त्या नंबरवर बर्‍याच वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण फोन बंद येत आहे. हृतिकक्षा आईचा मोबाईल न मिळाल्याने सारखी रडत आहे. हृतिकक्षानं आमच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी त्या फोनमध्ये साठवून ठेवल्या आहेत. ऑनलाईन शिकवणीच्या वेळीही तिनं तिच्या आईचा फोन वापरला होता. आता तो फोन शोधणे किंवा तिच्यासाठी नवीन फोन खरेदी करणं मला शक्य वाटत नाही, असं नवीन कुमार यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Karnataka, Social media