मागील 6 वर्षांपासून Lockdown मध्ये आहे ही महिला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

मागील 6 वर्षांपासून Lockdown मध्ये आहे ही महिला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

एक महिला स्वत:च्या मर्जीने गेल्या सहा वर्षांपासून लॉकडाउनमध्ये आहे, ती आपल्या घरातच कैद आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जून : मागील एक वर्ष 2020 पासून जगभरात लॉकडाउन (Lockdown) आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus Pandemic) सर्वांना आपल्या घरातच राहण्यास भाग पडलं आहे. परंतु एक महिला स्वत:च्या मर्जीने गेल्या सहा वर्षांपासून लॉकडाउनमध्ये आहे, ती आपल्या घरातच कैद आहे.

6 वर्षांपासून बाहेरच्या जगाशी संपर्क नाही -

35 वर्षीय एम्मा डेविस (Emma Davis) एमेटोफोबियाग्रस्त (Emetophobia) आहे. एमेटोफोबियामध्ये रुग्णाला नेहमी उलटी होणं (Vomiting), उलटी पाहिल्यानंतर किंवा एखाद्याला उलटी करताना पाहिल्यानंतर, त्यांना स्वत:ला उलटी होण्याची भीती असते. हा फोबिया काही लोकांसाठी इतका भयानक होतो, की त्यांची संपूर्ण लाइफस्टाईल बदलली जाते. याच भीतीमुळे एम्मा गेल्या सहा वर्षांपासून घरातून बाहेरच आल्या नाहीत. त्या बाहेर गेल्या, तर त्यांना उलटी होईल अशी भीती सतत त्यांना वाटत राहते.

एम्मा डेविस यांचा विचित्र आजार (Weird Disease) पाहून अनेक लोक त्यांना घाबरु लागले आहेत. त्यामुळेही त्या बाहेर जाण्याऐवजी घरातच राहणं पसंत करतात. त्यांना आपल्या घरात राहिल्यानेच आनंद वाटतो. परंतु त्यांना कधीतरी घरातच एमेटोफोबियाचा अटॅक येतो. एम्मा 23 वर्षांच्या असल्यापासून त्यांना आपला हा विचित्र आजार जाणवू लागला होता. बाहेर पडल्यानंतर किंवा बसमध्ये बसल्यानंतर त्यांना घाबरल्यासारखं होत होतं. त्यामुळे त्यांनी काम सोडून घरातच राहण्याचा निर्णय घेतला.

(वाचा - Google काही सेकंदात सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? यामागे काय असते प्रोसेस)

जवळपास 12 वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्यांना कोणताही फरक पडलेला नाही. वेळेसह त्यांचा आजार अधिकच वाढत चालला आहे. कधीतरी त्यांना एका दिवसांतच 6 वेळा पॅनिक अटॅक (Panic Attack) येतात. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांनी अनेक उपचार केले आहेत. परंतु त्या आजारातून बऱ्या झाल्या नसल्याने, त्या घरातच राहण्यास मजबूर आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: June 12, 2021, 7:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या